अर्थ मंत्रालय
महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये ई-सिगारेट तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात डीआरयची मोठी कारवाई
120 कोटी रुपयांच्या 3,00,000 इलेक्ट्रॉनिक सिगारेट/व्हेप केल्या जप्त
Posted On:
21 MAY 2026 1:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2026
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) प्रतिबंधित निकोटीन उत्पादनांच्या अवैध आयातीविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील अनेक बंदरे, विमानतळे आणि आयसीडी (ICD) मधील आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कारवाईत ई-सिगारेट (व्हेप) तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
सीमाशुल्क तपासणी टाळण्यासाठी चुकीच्या पद्धतीने घोषित केलेल्या अनेक संशयास्पद आयातीवर विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, डीआरआयने नजर ठेवली, त्यांचा मागोवा घेतला आणि त्या जप्त केल्या. सखोल तपासणीअंती, 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या, विविध ब्रँड, स्वाद आणि वैशिष्ट्यांच्या जवळपास 3,00,000 इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स/व्हेप्स जप्त केल्या.
दर वेळी, या प्रतिबंधित ई-सिगारेट्स चीनमधून मागवल्या जायच्या आणि “फर्निचर” व “धातूच्या खुर्चीचे भाग” यांसारख्या वस्तूंमध्ये लपवून आयात केली जात असल्याचे आढळून आले.
भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि सर्व इलेक्ट्रॉनिक निकोटीन वितरण प्रणाली (ENDS) सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि लोकांचे नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 'इलेक्ट्रॉनिक सिगारेट (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) कायदा, 2019 ' अंतर्गत प्रतिबंधित आहेत.

* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2263813)
अभ्यागत कक्ष : 5