इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सौरभ विजय यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

प्रविष्टि तिथि: 18 MAY 2026 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2026

 

सौरभ विजय यांनी सोमवारी 'भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा'चे (युआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. ते महाराष्ट्र कॅडरच्या 1998 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत.

आयआयटी-दिल्ली मधून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या सौरभ विजय यांनी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले.

युआयडीएआय मध्ये रुजू होण्यापूर्वी ते महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात प्रधान सचिव (व्यय) म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी प्रधान सचिव पर्यटन, सचिव वैद्यकीय शिक्षण, आणि सचिव उच्च व तंत्रशिक्षण यांसारख्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.

त्यांनी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केले . यामध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रपती सचिवालयात 'संचालक' म्हणून, तसेच वॉशिंग्टन डी.सी. येथे  जागतिक बँकेत बांगलादेश, भूतान, भारत आणि श्रीलंका या देशांच्या कार्यकारी संचालकांचे 'सल्लागार' म्हणून त्यांनी काम केले आहे.

 

* * *

निलिमा चितळे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2262580) आगंतुक पटल : 76
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu