युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रिय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी यावर्षी ग्लासगो इथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 साठी भारतीय पथकाच्या तयारीचा आढावा घेतला.
Posted On:
15 MAY 2026 2:57PM by PIB Mumbai
केंद्रिय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय चमूच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या तयारीत त्यांना सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांना मजबूत करण्याबरोबरच विविध घटकांबरोबर सुलभ समन्वय साधण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे प्रतिनिधी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीचे शेफ द मिशन आणि राष्ट्रीय क्रीडा प्रधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्र्यांनी खेळाडूंच्या तयारीचे नियोजन, खेळाडूंची तयारी आणि समन्वय यंत्रणांविषयींचा आढावा घेतला. क्रीडा मंत्र्यांनी यावेळी खेळाडूंची तयारी, प्रशिक्षणाची व्यवस्था, साधनसामुग्रीची उपलब्धता, कल्याणकारी योजना त्याचप्रमाणे विविध घटकांमधील समन्वयाचा आढावा घेतला.

यावेळी डॉ. मांडवीया यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी त्यांच्या क्षमतेच्या सर्वोच्च पातळीवर राहावी यासाठी सरकार खेळाडूंना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. योग्य नियोजन, विविध संस्थांमधील समन्वय आणि खेळाडूंना केंद्र स्थानी ठेऊन केलेली तयारी भारताचे या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील यश निश्चित करेल असेही त्यांनी अधोरेखित केले.
या बैठकीत ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या सांगता समारंभाबाबतही चर्चा करण्यात आली. भारत 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा यजमान असल्यामुळे या कार्यक्रमात भारताकडे बॅटन सुपूर्द केले जाणार आहे. 2030 च्या राष्ट्रकुल स्पर्धा गुजरातच्या अहमदाबाद इथे होणार आहेत.

याच संदर्भात गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि गुजरात सरकारचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत सामील झाले होते. या बैठकीत ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारी संदर्भात क्रीडा मंत्रालयांच्या सचिवांच्या इतर मंत्रालये आणि विभागांबरोबरच्या समन्वयाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेचा मुख्य भर आंतर-मंत्रालयीन समन्वय, सुविधा, पुरवठा यंत्रणा आणि भारतीय पथकाशी संबंधित सर्व व्यवस्थांची अंमलबजावणी सुरळीतपणे पार पडेल याची खात्री करण्यावर होता.

***
सुषमा काणे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2261457)
अभ्यागत कक्ष : 4