पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्याला संबोधित करतानाची काही क्षणचित्रे समाज माध्यमावर केली सामाईक

Posted On: 10 MAY 2026 3:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्याला संबोधित करतानाची काही क्षणचित्रे समाज माध्यमावर सामाईक केली आहेत.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेली संदेश मालिका:

“सेवा हा आपल्या समाजाचा नैसर्गिक स्थायीभाव आहे. पिढ्यानपिढ्या ती आपल्याला प्रेरित करण्यासोबतच ऊर्जेने भारून टाकत आली आहे. आर्ट ऑफ लिविंगच्या प्रत्येक प्रयत्नात याच भावनेचे प्रतिबिंब दिसून येते.”

“जेव्हा समाज स्वतः राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय सहभाग देत असतो तेव्हा कोणतेही सरकार यशस्वी होऊ शकते यावर माझा कायम विश्वास राहिला आहे. स्वच्छ भारत अभियानासारखे अनेक कार्यक्रम याची मोठी उदाहरणे आहेत.”

“देशाच्या यशामागे आपल्या युवा वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आधुनिक युगातील आव्हानांवरच्या उपाययोजनांचा शोध घेण्यात आर्ट ऑफ लिविंग या युवा वर्गाला मदत करत असल्याचा मला आनंद वाटतो.”

“भारताच्या सर्वंकष विकासासाठी अनेक पातळ्यांवर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आर्ट ऑफ लिविंग सारख्या संघटना अधिक ताकदीने या परिवर्तनाचे दूत बनू शकतात.”

***

राधिका अघोर/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2259535) अभ्यागत कक्ष : 6