पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे केले अभिनंदन


पश्चिम बंगाल सरकारच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांनाही पंतप्रधानांनी  दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 09 MAY 2026 1:55PM by PIB Mumbai


सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी, जनतेशी नाळ जोडलेला आणि लोकांच्या आकांक्षा चांगल्या रितीने समजून घेणारा नेता, अशी आपली ओळख निर्माण केली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी सुवेंदू अधिकारी यांना त्यांच्या फलदायी कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम तुडू आणि निसिथ प्रामाणिक यांनी पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचेही अभिनंदन केले आहे.
या सर्व नेत्यांनी तळागाळात अथक परिश्रम केले असून, लोकांची सेवा केली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. मंत्री म्हणून हे सर्व नेते पश्चिम बंगालच्या विकासाच्या वाटचालीला अधिक बळकटी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी या सर्व नेत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश:
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सुवेंदू अधिकारी यांचे अभिनंदन. जनतेशी नाळ जोडलेले आणि त्यांच्या आकांक्षा अधिक चांगल्या रितीने समजून घेणारे नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या फलदायी कार्यकाळासाठी माझ्या शुभेच्छा.
@SuvenduWB

दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम तुडू आणि निसिथ प्रामाणिक यांनी पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या सर्व नेत्यांनी तळागाळात राहून अथकपणे लोकांची सेवा केली. मंत्री म्हणून ते पश्चिम बंगालच्या विकासाच्या वाटचालीला अधिक गती देतील, असा विश्वास मला वाटतो.  माझ्याकडून शुभेच्छा.

@DilipGhoshBJP
@paulagnimitra1
@NisithPramanik

***

माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2259379) आगंतुक पटल : 66
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam