संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुसेना यांनी टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन या शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी केली पूर्ण

प्रविष्टि तिथि: 08 MAY 2026 2:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मे 2026

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलाने 7 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवर टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन (TARA) शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. TARA, हे एक मारक क्षमता वाढवणारे मॉड्युलर उपकरण असून, ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली आहे, जी नियंत्रण प्रणाली नसलेल्या स्फोटकांना अचूक लक्ष्यभेदी शस्त्रांमध्ये रूपांतरित करते.

जमिनीवरील लक्ष्यांना निष्प्रभ करण्यासाठी कमी किमतीच्या शस्त्राची संहारकता आणि अचूकता वाढवण्याच्या उद्देशाने, हैदराबाद येथील संशोधन केंद्र इमारत (RCI) ने संरक्षण संशोधन आणि विकास सांस्थेच्य इतर प्रयोगशाळांच्या सहकार्याने TARA ची रचना आणि विकास केला आहे. अत्याधुनिक कमी खर्चाच्या प्रणालींचा वापर करणारे हे पहिले ग्लाइड शस्त्र आहे. या किटचा विकास म्हणजेच विकास आणि उत्पादन भागीदार (डीसीपीपी) आणि इतर भारतीय उद्योगांच्या सहकार्याने करण्यात आला आहे. या भारतीय कंपन्यांनी या प्रणालीच्या उत्पादन प्रक्रियेलाही आधीच सुरुवात केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या पहिल्या उड्डाण चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय हवाई दल, डीसीपीपी आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले असून, भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनीही यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी असलेल्या पथकांचे अभिनंदन केले.

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2259031) आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Tamil , Telugu , Kannada