पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठी आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषद


वितरणातील चुका/गोंधळ टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोडच्या आधारावर डिलिव्हरी देण्याचे प्रमाण 95 %पर्यंत वाढवले

तेहरानमधील भारतीय दूतावासाने, 2,520 भारतीय नागरिकांना सीमारस्ते मार्गाने मायदेशी परत जाण्यासाठी केले सहकार्य

पश्चिम आशियातील बदलत्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांना सतत अद्ययावत माहिती देण्याचा उपक्रम ठेवला सुरू

Posted On: 06 MAY 2026 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मे 2026

ऊर्जा सुरक्षा आणि इंधन उपलब्धता

अंमलबजावणी आणि देखरेख व्यवस्था

· देशभरात एलपीजीची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी छापे घालणे आणि इतर प्रतिबंधात्मक कारवाया सुरूच आहेत. काल देशभरात 2100 हून अधिक छापे टाकण्यात आले.

· सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी आकस्मिक तपासण्या अधिक कडक केल्या असून 366 एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर कालपर्यंत 75 एलपीजी वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

· सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी आपल्या आकस्मिक तपासण्या अधिक मजबूत केल्या असून, त्या अंतर्गत आतापर्यंत 366 एलपीजी वितरकांवर दंडात्मक कारवाई केली आहे आणि 75 एलपीजी वितरकांचे परवाने रद्द केले आहेत.

एलपीजी पुरवठा

· व्यावसायिक पातळीवर ऑनलाइन एलपीजी सिलेंडर बुकिंगचे प्रमाण सुमारे 99% पर्यंत वाढले.

· वितरणातील चुका किंवा गडबड टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड ठरवण्यात आला आहे. तसेच (DAC) आधारित वितरण सुमारे 95% पर्यंत वाढले आहे. हा डीएसी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त होतो.

· गेल्या दोन दिवसांत सुमारे 88.83 लाख बुकिंग्जच्या तुलनेत 87. 28 लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडर वितरित करण्यात आले.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा व वाटप उपाययोजना:

· गेल्या दोन  दिवसांत पांच किलोच्या सुमारे 1.2 लाख एफटीएल सिलेंडरची विक्री झाली.

· तीन एप्रिल 2026 पासून सार्वजनिक तेल कंपन्यांनी यांनी पांच किलो एफटीएल सिलेंडर्ससाठी 10, 400 हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित केली असून, त्यामध्ये 1,84,000 हून अधिक इतक्या पांच किलो एफटीएल सिलेंडरची विक्री झाली आहे.

· काल 132 शिबिरांमधून सुमारे 4171 इतक्या पाच किलो एफटीएल सिलेंडरची विक्री झाली.

· गेल्या 2 दिवसांत सार्वजनिक तेल कंपन्यांकडून एकूण 876 मेट्रिक टन ऑटो एलपीजीची विक्री झाली.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तारविषयक उपक्रम

· मार्च 2026 पासून सुमारे 6.31 लाख पीएनजी जोडण्याना गॅस पुरवठा सुरू करण्यात आला असून, आणखी 2.67 लाख कनेक्शनसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत; त्यामुळे एकूण संख्या 8.98 लाख जोडण्यापर्यंत पोहोचली आहे. याशिवाय, सुमारे 6.93 लाख ग्राहकांनी नवीन जोडण्यासाठी नोंदणी केली आहे.

· 5 मे 2026 पर्यंत सुमारे 49,200 पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in या वेबसाइटद्वारे आपल्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि  आणि तेलशुद्धीकरण प्रकल्प कामकाज

· सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प पुरेशा कच्च्या तेलाच्या साठ्यासह उच्च क्षमतेने कार्यरत आहेत, तसेच पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा राखला जात आहे.    

.9 एप्रिल 2026 पासून मुंबई, कोची, विशाखापट्टणम, चेन्नई , मथुरा आणि गुजरात इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामधून, रासायनिक, औषधनिर्माण आणि रंगकाम  उद्योगांना 12,000 मेट्रिक टनांहून अधिक प्रोपिलीन आणि 1750 मेट्रिक टनांहून अधिक ब्युटाइल ॲक्रिलेटची विक्री करण्यात आली आहे

 किरकोळ इंधन उपलब्धता आणि मूल्यनिर्धारण उपाययोजना

· देशभरातील सर्व किरकोळ विक्री केंद्रे नियमितपणे कार्यरत आहेत. 

· देशातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या नियमित किरकोळ किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत  आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या  किरकोळ विक्री केंद्रांवर कोणतीही दरवाढ झालेली नाही.

सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक कार्यान्वयन

· संघर्षग्रस्त प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या 24 तासांमध्ये भारतीय ध्वजांकित जहाजांशी संबंधित कोणतीही घटना नोंदवली गेलेली नाही.

· गेल्या 48 तासांमध्ये भारतीय जहाजांशी किंवा भारतीय खलाशी असलेल्या परदेशी जहाजांशी संबंधित कोणतीही घटना घडल्याचे वृत्त नाही.

. नौवहन महासंचालनालय नियंत्रण कक्षाने कार्यान्वित झाल्यापासून 8,570 कॉल्स आणि 18,732 हून अधिक ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या 48 तासांमध्ये  एकूण  156 कॉल्स आणि  668 ईमेल्स प्राप्त झाले आहेत.

• नौवहन महासंचालनाद्वारे मंत्रालयाने आतापर्यंत 2,999 पेक्षा अधिक भारतीय खलाशांचे मायदेशी सुरक्षित परतणे सुलभ केले आहे. यामध्ये मागील 48 तासांमध्ये आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांच्या 23 खलाशांचा समावेश आहे.

· बंदरांवरील कामकाज: संपूर्ण भारतातील बंदरांवरील कामकाज सामान्य असून, कोणत्याही प्रकारची कोंडी  झाल्याचे वृत्त नाही.

 या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्याने संपर्कात असून माहितीचे आदानप्रदान आणि प्रयत्नांमध्ये समन्वय राखला जात आहे.

· भारतीय दूतावास येथील रहिवासी भारतीय समुदायासोबत सक्रियपणे कार्यरत आहेत. ते भारतीय समुदाय संघटना, संस्था, व्यावसायिक समूह आणि भारतीय कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधत आहेत.

· या प्रदेशातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास त्यांना स्थानिक अधिकारी आणि संस्थांशी समन्वय, वाणिज्य दूतावासाद्वारे सहाय्य, आणि भारतात परत येण्याच्या विनंतीला प्रतिसाद देण्यासह, सर्व प्रकारचे सहाय्य पुरवत आहे.

· या प्रदेशातून भारतातील विविध गंतव्यस्थानांसाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू झाल्यामुळे विमान सेवेची एकूण स्थिती सुधारत आहे.

· संयुक्त अरब अमिरातीचे हवाई क्षेत्र खुले आहे.भारत आणि  संयुक्त अरब अमिराती मधील विमान कंपन्या संयुक्त अरब अमिराती मधून  भारतातील विविध ठिकाणी विमानसेवा चालवत आहेत.

· सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा सुरू आहे.

· कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि कतार एअरवेज कतारहून भारतात विविध ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा चालवत आहेत.

· कुवेतचे हवाई क्षेत्र खुले आहे. जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेज कुवेतहून भारतासाठी  विमान सेवा चालवत आहेत.

· बहारीनचे हवाई क्षेत्र खुले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि गल्फ एअर बहारीनहून भारतातील विविध ठिकाणी विमानसेवा चालवत आहेत.

· इराकचे हवाई क्षेत्र या प्रदेशातील गंतव्यस्थानांसाठी मर्यादित विमान सेवेसह खुले आहे, याचा उपयोग भारतात पुढील प्रवासासाठी करता येईल.

· इराणचे हवाई क्षेत्र मालवाहू आणि चार्टर्ड विमानांसाठी अंशतः खुले आहे. मंत्रालयाने भारतीय नागरिकांनी इराण येथे प्रवास टाळावा अशी सूचना दिली असून, सध्या तिथे असलेल्या भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासाच्या सहाय्याने भू-सीमा मार्गांनी तिथून बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. आतापर्यंत तेहरानमधील भारतीय दूतावासाने 2,520 भारतीय नागरिकांना भू-सीमा मार्गांनी इराणमधून बाहेर पडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

· इस्रायलचे हवाई क्षेत्र खुले आहे आणि या प्रदेशातील गंतव्यस्थानांसाठी मर्यादित विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे, याचा उपयोग भारतात पुढील प्रवासासाठी करता येईल.

शैलेश पाटील/निलीमा चितळे/राधिका अघोर/सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2258525) अभ्यागत कक्ष : 8