पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींबाबत आंतर-मंत्रालयीन वार्ताहर परिषदेतील माहिती


खतांची उपलब्धता उत्तम आहे; मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे

पश्चिम आशियातील संकटानंतर उपलब्धतेसाठी एकूण सुमारे 84लाख मेट्रिक टन खतांची भर

Posted On: 04 MAY 2026 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2026

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार नियमितपणे ताज्या माहितीद्वारे नागरिकांना परिस्थितीबाबत सजग ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

खतांच्या साठ्याची सद्यस्थिती आणि उपलब्धता

देशातील खतांच्या साठ्याची एकंदर स्थिती

उत्पादन

आजच्या तारखेची स्थिती

गेल्या वर्षी आजच्या तारखेची स्थिती

युरिया

74.48

74.03

डीएपी

22.47

15.22

एनपीके

59.53

46.26

एसएसपी

26.71

26.63

एमओपी

12.52

12.84

एकूण

195.71

174.98

खरीप 2026 हंगामासाठी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 390.54 लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता असल्याचे मूल्यमापन केले आहे. त्या तुलनेत आजचा उपलब्ध साठा सुमारे 195.71 लाख मेट्रिक टन (50% पेक्षा जास्त) आहे, जो साधारणपणे  33% या सर्वसामान्य पातळीपेक्षा निश्चितच खूपच जास्त आहे. हे सरकारच्या सुधारित नियोजनाचे, आगाऊ साठवणुकीचे आणि कार्यक्षम लॉजिस्टिक व्यवस्थापनाचे प्रतिबिंब आहे.  

राज्यांमध्ये पुरवठ्याची स्थिती अतिशय भक्कम आहे. 1 मे 2026 ते 03 मे 2026 या कालावधीसाठी, खतांची उपलब्धता आवश्यकतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. युरियाची उपलब्धता 2.66 एलएमटी च्या आवश्यकतेच्या तुलनेत 62.28 लाख मेट्रिक टन आहे, डीएपीची उपलब्धता 0.85 लाख मेट्रिक टनांच्या आवश्यकतेच्या तुलनेत 20.32लाख मेट्रिक टन आहे, एमओपीची उपलब्धता 0.22लाख मेट्रिक टनांच्या आवश्यकतेच्या तुलनेत 7.60लाख मेट्रिक टन आहे, एनपीकेची उपलब्धता 1.16 लाख मेट्रिक टन च्या आवश्यकतेच्या तुलनेत 49.71लाख मेट्रिक टन आहे आणि एसएसपीची उपलब्धता 0.55लाख मेट्रिक टनांच्या आवश्यकतेच्या तुलनेत 24.60 लाख मेट्रिक टन आहे.  या स्थितीतून सध्याच्या खरीप हंगामासाठी खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

प्रमुख खतांची कमाल किरकोळ किंमत – प्रमुख खतांच्या कमाल किरकोळ किमतीत कोणताही बदल नाही:

उत्पादन

(रु. प्रति पोते )

युरिया

266.5

डीएपी

1350

टीएसपी

1300

देशांतर्गत उत्पादन आणि आखाती तणावानंतर खतांची आयात:

उत्पादन

तणावानंतर देशांतर्गत उत्पादन

तणावानंतर भारतीय बंदरात दाखल झालेली आयात

युरिया

40.72

9.98

डीएपी

5.39

0.76

एनपीके

13.65

3.54

एसएसपी

7.95

0

एमओपी

0

2.41

एकूण

67.71

16.69

तणावाच्या परिस्थितीनंतर खतांच्या उपलब्धतेमध्ये एकूण सुमारे 84 लाख मेट्रिक टनांची भर घालण्यात आली आहे.

· यंदाच्या एप्रिल-26 मध्ये, युरियाचे  देशांतर्गत उत्पादन जवळपास 20.98लाख मेट्रिक टन झाले  आहे, जे एप्रिल-25 मध्ये 21.89लाख मेट्रिक टन होते.

· जागतिक युरिया निविदा – फेब्रुवारी अखेरपासून आजतागायत भारताने एकूण 38.07लाख मेट्रिक टन (13.07 आरसीएफ + 25दशलक्ष मेट्रिक टन आयपीएल) पुरवठा सुरक्षित केला आहे.

डीएपी, टीएसपी आणि अमोनियम सल्फेटसाठी जागतिक निविदा - भारतीय खत कंपन्यांनी शुक्रवार, 24.04.2026 रोजी 12लाख मेट्रिक टन डीएपी, 4लाख मेट्रिक टन टीएसपी आणि 3लाख मेट्रिक टन अमोनियम सल्फेटच्या खरेदीसाठी एकत्रित जागतिक निविदा काढल्या आहेत. यामुळे सर्वाधिक मागणीच्या काळात पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होईल.

खत उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या (उदा. युरिया आणि P&K खते) उपलब्धतेचा खत विभागाकडून नियमित आढावा घेतला जात आहे.

खतांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत सक्षमीकरण गटाच्या  7 बैठका घेतल्या आहेत आणि खतांशी संबंधित बहुतेक सर्व समस्यांवर तोडगा काढण्यात आला आहे.

सर्व प्रमुख खतांच्या आवश्यकतेपेक्षा त्यांची उपलब्धता  अधिक असल्याने भारतातील  खत सुरक्षा भक्कम, स्थिर आणि सुव्यवस्थापित आहे.

ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता

अंमलबजावणी आणि देखरेख कारवाई

एलपीजी ची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणी विषयक कारवाई सुरू आहे. काल देशभरात 1570 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी, एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अचानक धाडी टाकण्याचे आणि दंडात्मक कारवाईचे सत्र सुरु ठेवले असून 349 एलपीजी वितरकांवर दंड आकारण्यात आला  आहे तर 74 वितरकांना निलंबित करण्यात आले आहे

एलपीजीचा पुरवठा

देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याची स्थिती

घरगुती ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने बहुतेक एलपीजी वितरक रविवारी देखील कार्यरत आहेत.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वितरण उपाययोजना:

· एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 23.58 लाखांपेक्षा जास्त 5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्री झाली आहे.

3 एप्रिल 2026 पासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 5  किलो एफटीएल सिलिंडरसाठी सुमारे 10,170 जनजागृती शिबिरे आयोजित केली असून, त्यामध्ये सुमारे 1,76,500 - 5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्रीही करण्यात आली.

नैसर्गिक गॅस पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

मार्च 2026 पासून, सुमारे 6.12 लाख पीएनजी जोडण्यांचे गॅसीकरण करण्यात आले आहे आणि अतिरिक्त 2.67 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे एकूण जोडण्यांची संख्या 8.79 लाख झाली आहे. याशिवाय, नवीन जोडण्यांसाठी सुमारे 6.79 लाख ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे.

03.05.2026 पर्यंत 43,760 पेक्षा अधिक पीएनजी ग्राहकांनी आपल्या एलपीजी जोडण्या  MYPNGD.in  या संकेतस्थळाच्या माध्यमातून परत केल्या आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि शुद्धीकरण कार्यप्रणाली

9 एप्रिल 2026 पासून मुंबई, कोची, विशाखापट्टणम , चेन्नई, मथुरा आणि गुजरात येथील रिफायनरींकडून केमिकल, फार्मा आणि पेंट उद्योगाला 10,750 मेट्रिक टनपेक्षा जास्त प्रोपिलीन आणि 1670 मेट्रिक टनपेक्षा जास्त ब्युटाइल ॲक्रिलेटची विक्री करण्यात आली आहे.

किरकोळ स्तरावरील इंधनाची उपलब्धता आणि किंमत उपाययोजना

देशातील पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या नियमित किरकोळ किंमतीत बदल झालेला नाही आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या किरकोळ विक्री स्थानी दरवाढ झालेली नाही.

सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक कार्यप्रणाली

त्या भागातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत तसेच गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाशी संबंधित कोणतीही घटना घडलेली नाही.

· नौवहन महासंचालनालयाचा  नियंत्रण कक्ष अपडेट: नौवहन महासंचालनालयाच्या नियंत्रण कक्षाने सक्रिय झाल्यापासून 8,414 कॉल्स आणि 18,064 पेक्षा जास्त ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या 24 तासांत 41 कॉल्स आणि 99 ईमेल्स प्राप्त झाले आहेत.

· मायदेशी परत पाठवण्याबाबत अद्ययावत माहिती: मंत्रालयाने, नौवहन महासंचालनालयाच्या माध्यमातून, आतापर्यंत 2,976 हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत पाठवण्याची सोय केली आहे, ज्यामध्ये आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून गेल्या 24 तासांत परत आणलेल्या 23 खलाशांचा समावेश आहे.

या प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा

परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया प्रदेशातील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून आहे, आणि या प्रदेशातील भारतीय समुदायाची सुरक्षा, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. या संदर्भात पुढील माहिती देण्यात आली आहे :

· भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास तातडीने मदत पुरवण्यासाठी चोवीस तास हेल्पलाईन चालवत आहेत आणि आपल्या नागरिकांना सक्रियपणे मदत करत आहेत. स्थानिक सरकारांशी देखील सातत्याने संपर्क साधला जात आहे.

· स्थानिक सरकारच्या मार्गदर्शक सूचना, विमान आणि प्रवासाची परिस्थिती, वाणिज्य दूतावासाच्या सेवा आणि समुदायासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी उपाययोजनांशी संबंधित माहितीसह अद्ययावत सूचना जारी केल्या जात आहेत.

· भारतीय दूतावास येथील निवासी  भारतीय समुदायासोबत नियमित संवाद साधत  आहे.

· सरकार या प्रदेशातील भारतीय खलाशांच्या कल्याणाला उच्च प्राधान्य देत आहे. भारतीय दूतावास त्यांना सर्वतोपरी मदत करत आहेत, ज्यामध्ये स्थानिक अधिकारी आणि संस्थासोबत समन्वय साधणे, वाणिज्य दूतावासाची मदत देणे आणि भारतात परत येण्याची विनंती करणाऱ्यांना साहाय्य करणे यांचा समावेश आहे.

 · या प्रदेशातून भारतातील विविध ठिकाणांसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू झाल्याने, एकूण विमान वाहतूक परिस्थितीत सुधारणा होत आहे.

· संयुक्त अरब अमिरातीचे हवाई क्षेत्र खुले आहे. भारतीय आणि यूएई विमान कंपन्या संयुक्त अरब अमिराती मधून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे चालवत आहेत.

· सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे सुरू आहेत.

· कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि कतार एअरवेज कतारमधून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे चालवत आहेत.

· कुवेतचे हवाई क्षेत्र खुले असून जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेज कुवेतहून भारतासाठी विमान उड्डाणे चालवत आहेत.
 

· बहरीनचे हवाई क्षेत्र खुले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि गल्फ एअर बहारीनहून भारतातील विविध ठिकाणांसाठी विमान उड्डाणे चालवत आहेत.

· इराकचे हवाई क्षेत्र मर्यादित विमान उड्डाणांसह खुले आहे, ज्याद्वारे पुढे भारतात प्रवास करता येऊ शकतो.

 · इराणचे हवाई क्षेत्र मालवाहू आणि चार्टर्ड विमानांसाठी अंशतः खुले आहे. भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जात आहे आणि आधीपासूनच तेथे असलेल्या नागरिकांना भारतीय दूतावासाच्या मदतीने रस्ते मार्गांनी बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे., तेहरानमधील भारतीय दूतावासाने आतापर्यंत 2504 भारतीय नागरिकांना रस्ते मार्गे  इराणमधून बाहेर पडण्यास मदत केली आहे.

· इस्रायलचे हवाई क्षेत्र खुले असून या प्रदेशातील ठिकाणांसाठी मर्यादित विमान उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहे, ज्याद्वारे पुढे भारतात प्रवास करता येऊ शकतो.


निलीमा चितळे/सुषमा काणे/शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर‍


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2257923) अभ्यागत कक्ष : 10