भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वाधिक मतदानाची नोंद


निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, 91.66% इतक्या मतदानाची नोंद

Posted On: 29 APR 2026 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2026

 

पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजल्यापसून मतदान झालं.

संध्याकाळी 7:45 च्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यांत, एकूण 91.66% इतके विक्रमी मतदान झाले. पहिल्या टप्प्यातही, पश्चिम बंगालमध्ये 92.47%. इतके मतदान झाले होते. याआधी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान, 84.72% इतके 2011 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत झाले होते. गेल्या अनेक वर्षातील, मतदानाची नोंद खाली परिशिष्टात जोडलेली आहे.

General Elections to Legislative Assembly of WB (Phase-II)

Poll Percentage (%) *+

Male

Female

3rd Gender

Total

91.07

92.28

91.28

91.66

*निवडणूक आयोगाच्या ECINET प्रणालीमध्ये जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अपलोड केलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील 5,343 मतदान केंद्रांची अद्ययावत माहिती अद्याप मिळणे बाकी आहे.

ही माहिती प्राथमिक असून यात सेवा मतदार  तसेच टपाली मतपत्रिका यांचा समावेश नाही. अंतिम आकडेवारी ECINET वरील इंडेक्स कार्ड्सद्वारे सामायिक केली जाईल.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच निवडणूक आयुक्त डॉ. एस.एस. संधू आणि डॉ. विवेक जोशी  यांनी लाईव वेबकास्टिंग च्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.  या दुसऱ्या टप्पात, 100 टक्के मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256793) अभ्यागत कक्ष : 31