पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट; सिक्कीमच्या विलक्षण जैवविविधतेचे केले कौतुक
Posted On:
28 APR 2026 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीममधील गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील सौंदर्य आणि राज्याच्या विलक्षण जैवविविधतेचे कौतुक केले. ऑर्किडेरियमच्या या भेटीचे वर्णन पंतप्रधानांनी एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असल्याचे म्हटले आहे. निसर्ग संवर्धनाचे असे समर्पित प्रयत्न हे मानवाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते दर्शवतात, हे उपक्रम नागरिकांना निसर्ग संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरतील, असे त्यांनी नमूद केले.
एक्स वर एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले की,
गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट दिली आणि तिथल्या सौंदर्याने मी मंत्रमुग्ध झालो. सिक्कीमची समृद्ध निसर्ग संपदा खरोखरच अफाट आहे. असे प्रयत्न निसर्गाशी असलेले आपले घट्ट नाते दर्शवतात. तसेच, हे प्रयत्न आपल्याला निसर्ग जपण्यासाठी आणि शाश्वत जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात.
* * *
शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2256391)
अभ्यागत कक्ष : 10