पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत ताजी माहिती


एलपीजी वितरकांकडे कुठेही तुटवड्याची नोंद झालेली नाही; काल 51.8 लाखाहून अधिक घरगुती एलपीजी सिलिंडर्सचे वितरण करण्यात आले

आतापर्यंत 42,500 हून अधिक पीएनजी ग्राहकांनी आपली एलपीजी जोडणी केली परत

संपूर्ण आखाती प्रदेशातून 2,764 हून अधिक भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले; यामध्ये गेल्या 24 तासांतील 24 जणांचा समावेश

Posted On: 26 APR 2026 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2026

पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र  सरकार समन्वित प्रतिसाद उपायांद्वारे महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सज्जता आणि सातत्य राखण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. ऊर्जा पुरवठा, सागरी ऑपरेशन्स आणि या प्रदेशातील भारतीय नागरिकांना मदत करण्याबाबत उचलण्यात येत असलेल्या पावलांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित सध्याच्या परिस्थितीच्या संदर्भात, देशभरात पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलत आहे. मंत्रालयानुसार:

अंमलबजावणी आणि देखरेख कृती

• एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणीची कारवाई सुरू आहे. काल देशभरात 2100 हून अधिक छापे टाकण्यात आले.

• सार्वजनिक क्षेत्रातील, तेल विपणन कंपन्यांनी अचानक तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून, कालपर्यंत 310 एलपीजी वितरणांवर दंड आकारला आहे आणि 70 एलपीजी वितरणांचे परवाने निलंबित केले आहेत.

एलपीजी पुरवठा

घरगुती एलपीजी पुरवठ्याची स्थिती:

• सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठा प्रभावित होत आहे.

• घरगुती वापरासाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

• एलपीजी वितरणाच्या कोणत्याही केंद्रावर तुटवडा निर्माण झाल्याची नोंद झालेली नाही.

• काल उद्योग स्तरावर ऑनलाइन एलपीजी सिलेंडर बुकिंगमध्ये सुमारे 98 % वाढ झाली आहे.

• गळती किंवा गैरवापर रोखण्यासाठी 'डिलीव्हरी ऑथेंटिकेशन कोड' (डीएसी) अर्थात वितरण प्रमाणीकरण संकेतांक आधारित वितरण सुमारे 94 % पर्यंत वाढले आहे. ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर हा डीएसी प्राप्त होतो.

• 25.04.2026 रोजी, 51.8 लाखाहून अधिक घरगुती एलपीजी सिलिंडर्सचे वितरण करण्यात आले.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाय:

• संकटपूर्व जितका व्यावसायिक एलपीजी पुरवठा होत होता, त्याच्या सुमारे 70 % पर्यंत आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. या 70 % मध्ये 10 % हिस्सा हा सुधारणा योजनेशी संबंधित अतिरिक्त वाटपाचा आहे.

• 1 एप्रिल 2026 पासून, 5 किलोचे 19.44 लाखाहून अधिक एफटीएल सिलिंडर्स विकले गेले आहेत.

• काल देशभरात सुमारे 5 किलोचे 82,000 एफटीएल सिलिंडर्स विकले गेले.

• 3 एप्रिल 2026 पासून सरकारी तेल कंपन्यांनी  5 किलोच्या छोट्या एल पी जी सिलिंडरबाबत लोकांमध्ये माहिती आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी 8,950 पेक्षा जास्त शिबिरे घेतली आहेत. आणि या कालावधीत असे 1,42,000 पेक्षा जास्त 5 किलोचे एफटीएल सिलिंडरही विकले गेले आहेत.

• काल, 190 हून अधिक शिबिरांमधून  5 किलोचे 3846 एफटीएल सिलिंडर्स विकले गेले.

• एप्रिल-26 (25.04.26 पर्यंत) या महिन्यात, एकूण 1,64,655 एमटी (19 किलोच्या 86.66 लाखाहून अधिक एलपीजी सिलिंडर्सच्या बरोबरीचे) व्यावसायिक एलपीजी विकले गेले आहेत.

• 25.04.2026 रोजी, 9131 एमटी व्यावसायिक एलपीजी (19 किलोच्या सुमारे 4.80 लाख सिलिंडर्सच्या बरोबरीचे) विकले गेले.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

डी-पीएनजी आणि सीएनजी वाहतूक क्षेत्राला 100% वायू पुरवठा करत ग्राहकांना प्राधान्य दिले जात आहे.

खत कारखान्यासाठी एकंदर वायू पुरवठ्यात वाढ करण्यात आली असून, त्याच्या गेल्या सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या सुमारे 95% इतका वायू पुरवठा वाढवण्यात आला आहे.

त्या व्यतिरिक्त, इतर औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना सीजीडी वितरण जाळ्यामार्फत होणारा वायू पुरवठा 80% पर्यंत वाढवण्यात आला आहे.

मार्च 2026 पासून, साधारणपणे 5.45 लाख पीएनजी जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत आणि अतिरिक्त 2.62 लाख जोडण्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, त्यामुळे या जोडण्यांची संख्या 8.07 लाखांवर पोहोचली आहे. त्याशिवाय, 6.14 लाख ग्राहकांनी नव्या जोडण्यांसाठी मागणी नोंदवलेली आहे.

25.04.2026 पर्यंत, 42,500 पीएनजी ग्राहकांनी त्यांच्या एलपीजी जोडण्या मायपीएनजीडी डॉट इन या संकेतस्थळाद्वारे परत केल्या आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि शुद्धीकरण कारखान्याचे कामकाज

सर्व तेल शुद्धीकरण कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, त्यांच्याकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे; त्याचवेळी पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा राखला जात आहे.

घरगुती वापराची गरज पूर्ण करण्यासाठी शुद्धीकरण कारखान्यातून होणाऱ्या घरगुती एलपीजी उत्पादनात वाढ करण्यात आली आहे.

देशांतर्गत  बाजारपेठेसाठी पेट्रोकेमिकलच्या कच्च्या मालाचा पुरवठा अखंडितपणे उपलब्ध होण्याची खात्री करण्यासाठी, विविध मंत्रालयांचा समावेश असलेला एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. त्याचबरोबर, भारत सरकारने 01.04.2026 रोजी पारित आदेशान्वये, पेट्रोकेमिकल संयुगांचा समावेश असलेल्या तेल शुद्धीकरण कंपन्यांना, सेंटर फॉर हाय टेक्नॉलॉजीने निश्चित केलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी सी3 आणि सी4 वायू विशिष्ट किमान प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी परवानगी दिली आहे.

औषध विभाग, रसायने आणि पेट्रो-रसायने विभाग आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंतीवरून, औषध आणि रसायन क्षेत्रातील आस्थापनांसाठी दररोज 1000मेट्रीक टन/दिवस एलपीजी पूलमधून वायू उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
9 एप्रिल 2026 पासून, मुंबई, कोची, विशाखापट्टणम , चेन्नई आणि मथुरा तेलशुद्धीकरण प्रकल्पांनी 7600 मेट्रीक टनांहून अधिक प्रोपलिन वायूची विक्री केली आहे.

किरकोळ इंधन उपलब्धता आणि किंमत निश्चितीच्या उपाय योजना

देशभरातली किरकोळ इंधन विक्री केंद्रांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत अनपेक्षित वृद्धी नोंदवण्यात आली, मात्र ग्राहकहिताचे रक्षण करण्यासाठी, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लीटर 10 रुपयांची कपात केली आहे.

सागरी सुरक्षा आणि जलवाहतूक कार्यचालन

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने या क्षेत्रातील भारतीय जहाज आणि खुलाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मंत्रालयाने नमूद केले आहे की,सागरी वाहतूक सुरळीत आणि विनासायास होण्यासाठी हे मंत्रालय,परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारतीय दूतावास आणि सागरी वाहतुकीच्या क्षेत्रातील भागधारकांशी समन्वय साधून आहे.

  • प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित कोणत्याही घटनेची नोंद झालेली नाही.
  • नौवहन महासंचालनालय नियंत्रण कक्षाने कार्यान्वित झाल्यापासून 7,755 दूरध्वनी आणि 16,518 पेक्षा जास्त ईमेल हाताळले आहेत. गेल्या 24 तासांत 57 दूरध्वनी आणि 192 ईमेल प्राप्त झाले आहेत.
  • नौवहन महासंचालनालयाने आतापर्यंत 2,764 पेक्षा जास्त भारतीय खलाशांच्या सुरक्षित मायदेशी परतण्याची सोय केली आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून परतलेल्या 24 खलाशांचा समावेश आहे.
  • भारतातील सर्व बंदरांवरील कामकाज सामान्य असून कोठेही कोंडीची नोंद नाही.

प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षितता

  • परराष्ट्र मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशिया प्रदेशातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे. यामध्ये या प्रदेशातील भारतीय समुदायाची सुरक्षितता, सुरक्षा आणि कल्याणावर विशेष भर दिला जात आहे.

माहिती देण्यात आली आहे की:

  • भारतीय दूतावास आणि कार्यालये चोवीस तास हेल्पलाईन चालवत आहेत आणि भारतीय नागरिकांना सक्रियपणे मदत करत आहेत. ते स्थानिक सरकारांच्या सतत संपर्कात आहेत.
  • स्थानिक सरकारी मार्गदर्शक तत्त्वे, विमान आणि प्रवासाची स्थिती, दूतावास सेवा आणि समुदायाला आधार देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी उपायांच्या माहितीसह अद्ययावत सूचना नियमितपणे जारी केल्या जात आहेत.
  • भारतीय दूतावास या प्रदेशातील विविध संघटना, संस्था, व्यावसायिक गट, भारतीय कंपनी आणि इतर संबंधित घटकांसह भारतीय समुदायाशी सक्रियपणे जोडलेले आहेत.
  • 28 फेब्रुवारीपासून, सुमारे 12,96,000 प्रवाशांनी या प्रदेशातून भारताचा प्रवास केला आहे.
  • युएईमध्ये, विमान कंपन्या परिचालन आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव युएई आणि भारत दरम्यान मर्यादित व्यावसायिक उड्डाणे सुरू ठेवत आहेत, आज युएई आणि भारत दरम्यान सुमारे 110 उड्डाणे अपेक्षित आहेत.
  • इराकची हवाई हद्द खुली असून या प्रदेशातील ठिकाणांसाठी मर्यादित उड्डाणे सुरू असून याचा वापर भारताकडे पुढील प्रवासासाठी केला जाऊ शकतो.
  • इराणची हवाई हद्द मालवाहू आणि खासगी विमानांसाठी अंशतः खुली आहे. भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जे आधीच इराणमध्ये आहेत त्यांना आपल्या दूतावासाच्या मदतीने जमिनीच्या सीमेवरून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत, तेहरानमधील भारतीय दूतावासाने 2,445 भारतीय नागरिकांना जमिनीच्या सीमा मार्गाने इराणबाहेर नेण्याची सोय केली आहे.
  • इस्रायल: इस्रायलची हवाई हद्द खुली आहे आणि या प्रदेशातील ठिकाणांसाठी मर्यादित उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत. याचा वापर भारताच्या पुढील प्रवासासाठी केला जाऊ शकतो.


सुषमा काणे/आशुतोष सावे/विजयालक्ष्मी साळवी/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2255727) अभ्यागत कक्ष : 23