पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त लोकप्रतिनिधींना शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 24 APR 2026 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 एप्रिल 2026

 

पंचायती राज संस्थांना संविधानात्मक दर्जा देणाऱ्या 73 व्या घटना दुरुस्ती कायद्याला 33 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य आणि राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंचायती राज मंत्रालयाने आज नवी दिल्ली इथे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला. हरयाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मधील ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाले.

   

देशभरातील लोकप्रतिनिधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायती राज दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रसेवेप्रति  तुमची निष्ठा सर्वांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे,” असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांचा लिखित संदेश राष्ट्रीय कार्यक्रमात वाचून दाखविण्यात आला आणि तो सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील पंचायती राज संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंचायती राज संस्था या ग्रामीण भारताच्या शाश्वत विकासाचा कणा आहेत, असे सांगून, गावे, शेतकरी आणि स्थानिक समुदायांच्या विकासाच्या पायावर उभारलेला ‘विकसित भारत’ साकार करण्यासाठी पंचायतींचे सबलीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. क्षमता बांधणी कार्यक्रमांच्या सकारात्मक परिणामांकडे लक्ष वेधून घेताना त्यांनी नमूद केले की, निवडून आलेले लोकप्रतिनिधी, विशेषतः महिलांमध्ये नेतृत्व आणि निर्णय प्रक्रियेत लक्षणीय परिवर्तन दिसून येत आहे.

   

पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सबलीकरणावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमात आर्थिक वर्ष 2023-24 साठी पंचायत प्रगती निर्देशांक (पीएआय) 2.0 अहवाल प्रकाशित करण्यात आला.

पंचायती राज दिवस के अवसर पर देशभर के जनप्रतिनिधियों का हार्दिक अभिनंदन! जनसेवा के साथ राष्ट्रसेवा के प्रति आप सभी का समर्पण हर किसी को प्रेरित करने वाला है।

प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।

नात्मप्रियं प्रियं राज्ञः प्रजानां तु प्रियं प्रियम्॥ pic.twitter.com/gb0K3Rr709

— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2026

 

* * *

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2255439) आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Gujarati , Telugu