पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी लोकप्रतिनिधींचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशभरातील लोकप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
24 APR 2026 11:54AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधीचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।
नात्मप्रियं प्रियं राज्ञः प्रजानां तु प्रियं प्रियम्॥
या सुभाषिताचा अर्थ आहे की, लोकांच्या सुखातच लोकप्रतिनिधीचे सुख असते, लोकांच्या कल्याणातच त्याचे कल्याण असते. लोकप्रतिनिधीला कोणत्याही वैयक्तिक आवडी-निवडी नसतात, जे लोकांना प्रिय असते, तेच त्याला प्रिय असते.
आजच्या पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील लोकप्रतिनिधींना मोदी यांनी शुभेच्छाही दिल्या. तुमची जनसेवेतील निष्ठा आणि राष्ट्रसेवा सर्वांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
एक्स या समाज माध्यमांवरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले की;
पंचायती राज दिनानिमित्त देशभरातील लोकप्रतिनिधींचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमची लोकसेवा आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।
नात्मप्रियं प्रियं राज्ञः प्रजानां तु प्रियं प्रियम्॥
* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2255181)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam