कंपनी व्यवहार मंत्रालय
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठीच्या निकषात बदल करत, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी केले पात्रतेत समाविष्ट
Posted On:
22 APR 2026 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2026
युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगांसाठीची सज्जता वाढवण्यासाठी, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, (PMIS) पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी यासाठी पात्र ठरू शकतील. यामुळे, देशभरातील, आघाडीच्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या संधी लवकरात लवकर, उपलब्ध होऊ शकतील. म्हणजे त्यांचे औपचारिक शिक्षण सुरू असतांनाच त्यांना उद्योग-कंपन्यांच्या प्रत्यक्ष कामाचाही अनुभव मिळेल. शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, उच्च शिक्षण विभागाशी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवे बदल:
- पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थी आता, पीएमआयएस योजनेसाठी आवेदन करण्यास पात्र ठरतील.
- आवेदकांना या योजनेअंतर्गत, सध्या असलेले इतर निकष पूर्ण करावे लागतील.
- विद्यार्थ्यांना, त्यांच्या संबधित उच्च शिक्षण संस्थांकडून मिळालेले “ना-हरकत प्रमाणपत्र” आवेदन भरतानाच सादर करावे लागेल.
- या ना हरकत प्रमाणपत्रात, ह्या इंटर्नशिप मधील सहभाग, शैक्षणिक गरजांसोबत हस्तक्षेप करणारा नसेल, याचा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे असेल.
- त्यावरील अधिकृत स्वाक्षरी, विभागप्रमुख, प्राचार्य किंवा प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी यांची असावी.
भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात, प्रायोगिक अध्ययनावर विशेष भर देण्यात आला आहे, यात प्रशिक्षण, उद्योग-प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा समावेश असून, ते उच्च शिक्षणाचा एक महत्वाचा घटक मानले गेले आहेत. विद्यार्थ्यांना, अशा संरचनात्मक आणि मानधन मिळणाऱ्या प्रशिक्षणात, विद्यार्थी दशेतच सहभागी होऊ देण्यामागे, पीएमआयएस चे उद्दिष्ट- मुलांना प्रत्यक्ष जगातील व्यवहारीक शिक्षणाची जोड, पुस्तकी शिक्षणाला देणे हे साध्य होण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता आणि कौशल्यविकास वाढवण्याच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टाला यामुळे पाठबळ मिळेल आणि शिक्षणातून रोजगाराकडे जाण्याचा प्रवास अधिक सुलभ होईल.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी देऊन, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेने, पुस्तकी शिक्षण आणि उद्योगाच्या अपेक्षा यांमधील दरी कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यामुळे पदवी पूर्ण करतानाच नोकरीसाठी विद्यार्थी तयार होतात, तसेच व्यवसायिक वातावरण, कॉर्पोरेट प्रक्रिया आणि व्यावसायिक संस्कृतीचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो.
* * *
सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254552)
अभ्यागत कक्ष : 12