पंतप्रधान कार्यालय
सनदी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व सनदी अधिकाऱ्यांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
21 APR 2026 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सनदी सेवा दिनानिमित्त देशभरातील सनदी सेवा अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस,सुशासन आणि राष्ट्र उभारणीसाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचा असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. “तळागाळापासून ते धोरण निर्मितीपर्यंत, सनदी अधिकाऱ्यांचे कार्य, त्यांचे प्रयत्न, लक्षावधी सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याला स्पर्श करणारे आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणारे असतात. हे सनदी अधिकारी, पुढेही अशीच उत्कृष्टता, करुणाभाव आणि कल्पकतेने देशाची सेवा करत राहोत, आपल्या कर्तव्यभावनेची ऊंची सदैव वाढवत राहोत” असे मोदी यांनी म्हटले आहे.
एक्स वर मोदी यांनी लिहिले आहे:
"सर्व सनदी सेवा अधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस,सुशासन आणि राष्ट्र उभारणीसाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचा आहे. तळागाळापासून ते धोरण निर्मितीपर्यंत, सनदी अधिकाऱ्यांचे कार्य, त्यांचे प्रयत्न, लक्षावधी सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याला स्पर्श करणारे आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणारे असतात. तुम्ही सर्व सनदी अधिकारी, पुढेही अशीच उत्कृष्टता, करुणाभाव आणि कल्पकतेने देशाची सेवा करत राहोत, आपल्या कर्तव्यभावनेची ऊंची सदैव वाढवत राहोत.”
सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2254157)
अभ्यागत कक्ष : 10