पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शेती आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
20 APR 2026 8:36AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शेती हा आपल्या समृद्धीचा पाया आहे आणि शेतकरी बंधू-भगिनी हे देशाचे अन्नदाता आहेत. त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पणच देशाची प्रगती सुनिश्चित करतात, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले-
“कृषिर्धन्या कृषिर्मेध्या जन्तूनां जीवनं कृषिः।
अन्नदः सर्वदश्चैव तस्माच्छ्रेष्ठतरो हि सः॥”
सुभाषित सांगते की, शेती हे संपत्तीचे साधन आहे, बुद्धी पवित्र करणारी आहे आणि सर्व जीवांचा आधार आहे. जो शेतकरी पिके पिकवतो आणि जगाला धान्य पुरवतो, तोच खऱ्या अर्थाने प्रत्येकाला सर्वकाही देणारा अंतिम दाता आहे; कारण अन्नाशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे दान किंवा भौतिक संपत्ती उपयोगाची नसते. म्हणून, शेती करणारा शेतकरी सर्वांत श्रेष्ठ आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“शेती हा आपल्या समृद्धीचा पाया आहे आणि आपले शेतकरी बंधू-भगिनी देशाचे अन्नदाता आहेत. त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पणच देशाची प्रगती सुनिश्चित करतात.
कृषिर्धन्या कृषिर्मेध्या जन्तूनां जीवनं कृषिः।
अन्नदः सर्वदश्चैव तस्माच्छ्रेष्ठतरो हि सः॥”
***
NitinFulluke / SushamaKane / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2253662)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam