पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सर्जनशील लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ बलबीर पुंज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 19 APR 2026 12:08AM by PIB Mumbai

 

सर्जनशील लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ बलबीर पुंज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

बलबीर पुंज जी हे एक सर्जनशील लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ होते, त्यांनी माध्यम जगताला समृद्ध करणारे मोठे योगदान दिले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांचे लेखन मोठ्या प्रमाणावर वाचले जात असे आणि त्यातून देशाच्या पुनरुत्थानाप्रती असलेली त्यांची प्रबळ ओढ दिसून येत असे, असेही त्यांनी म्हटले आहे. पुंज यांनी संसदेत केलेली भाषणे ही तथ्य आणि सिद्धांतांनी समृद्ध असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

"श्री बलबीर पुंज जी हे एक सर्जनशील लेखक, विचारवंत आणि लोक तत्वज्ञ होते. त्यांनी माध्यम जगताला समृद्ध करणारे मोठे योगदान दिले त्यांचे लेखन मोठ्या प्रमाणावर वाचले गेले असून, देशाच्या पुनरुत्थानाप्रती असलेली त्यांची प्रबळ ओढ दिसून येते. संसदेतील त्यांची भाषणे ही तथ्य आणि सिद्धांतांनी समृद्ध होती.

श्री बलबीर पुंज जी यांनी विशेषतः विद्यार्थी, उद्योजक-व्यावसायिक, अभ्यासक आणि बुद्धीवंतांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी गुजरातसह विविध राज्यांचे प्रभारी म्हणून काम पाहिले होते. त्या काळातील आमच्यातील संवाद आणि भेटीगाठी मला ठळकपणे आठवतात. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या प्रती माझ्या शोकसंवेदना, ओम शांती."

***

यश राणे/ तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2253502) आगंतुक पटल : 56
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam