पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केली दिल्ली-देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणाची क्षणचित्रे
प्रविष्टि तिथि:
14 APR 2026 10:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली-देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणाची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
एक्सवरील पोस्टच्या एका मालिकेत मोदी म्हणाले;
“बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचे जीवन गरीब, वंचित आणि शोषितांना न्यायपूर्ण व्यवस्था देण्यासाठी समर्पित होते. आमचे सरकार देखील आज त्याच भावनेने सर्वांना खरा सामाजिक न्याय देण्यात गुंतलेले आहे.
“देशातील रस्ते, महामार्ग, द्रुतगती मार्ग, एयर-वे, रेल्वे आणि जलमार्ग विकासाच्या भाग्यरेषा आहेत. गेल्या एका दशकात आमचे सरकार यांच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.”
“आज ज्या देहरादून-दिल्ली इकॉनॉमिक कॉरिडोरचे उद्घाटन झाले आहे, त्यामुळे या संपूर्ण क्षेत्राचा कायापालट होणार आहे. यामुळे केवळ ये-जा करणेच स्वस्त आणि जलद होणार नाही तर यामुळे उत्तराखंडचे पर्यटन आणि व्यापाराला देखील खूप जास्त प्रमाणात फायदा होईल.”
“उत्तराखंडमध्ये देशातून-जगभरातून येणाऱ्या सर्व पर्यटकांना आणि यात्रेकरूंना माझे हे विशेष आवाहन…”
“देवभूमी उत्तराखंडमधून देशाच्या सर्व पक्षांना मी पुन्हा एकदा आवाहन करत आहे की त्यांनी नारीशक्ती वंदन अधिनियमामध्ये सुधारणांना नक्की पाठिंबा द्या. आम्ही 2029 पासूनच देशातील माता-भगिनींना त्यांचा अधिकार देणारच.”
“सैन्यदलाचे सामर्थ्य बळकट करणे असो किंवा आमच्या सैनिकांच्या कुटुंबांना सुविधा आणि सन्मान देण्याची गोष्ट असो, आमचे सरकार या दिशेने कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.”
* * *
माधुरी पांगे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2252012)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam