गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी खालसा पंथाचा स्थापना दिन आणि बैसाखी निमित्त दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 14 APR 2026 1:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2026

 

केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज खालसा पंथाचा स्थापना दिन आणि बैसाखीच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्सवरील एका संदेशामध्ये अमित शाह म्हणाले, “खालसा पंथाचा  स्थापना दिन आणि बैसाखीच्या पावन सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. हा पवित्र दिवस श्री गुरु गोबिंद सिंह जी यांनी खालसा पंथाची स्थापना केल्याची आठवण करून देतो. ही प्रेरणा आपल्याला सत्य आणि धर्माच्या मार्गावर निर्भयपणे चालण्याचे धैर्य देते. बैसाखी हा ज्यांच्या समर्पणामुळे संपूर्ण देशात समृद्धी येते त्या मेहनती शेतकऱ्यांच्या आनंदाचा उत्सवही आहे. या पवित्र आणि शुभ प्रसंगी, मी खालसा पंथाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या अन्नदात्यांच्या अथक परिश्रमांना वंदन करतो.”

 

* * *

सुषमा काणे/नितीन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2251827) आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Kannada