पंतप्रधान कार्यालय
‘नारी शक्ती वंदन संमेलना’मधील आपल्या भाषणाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक
Posted On:
13 APR 2026 11:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2026
नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित ‘नारी शक्ती वंदन संमेलना’तील आपल्या भाषणाची काही क्षणचित्रे पंतप्रधानांनी सामायिक केली आहेत. त्यांनी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि सक्षमीकरणाप्रती देशाची वचनबद्धता अधोरेखित केली.
पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमालिकांमध्ये लिहिले आहे :
"नवी दिल्लीमध्ये नारी शक्ती वंदन संमेलनात माता, भगिनी आणि कन्यांच्या उत्साह आणि आत्मविश्वासाने नवी ऊर्जा संचारली."
“वर्ष 2029 मध्ये नारी शक्ती वंदन कायदा लागू करण्याबाबत विरोधी पक्षांच्या भावनांचा पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. ही प्रक्रिया संवाद, सहयोग आणि सहभागातून पुढे नेण्याचा, आमचा संसदेत 16 एप्रिलपासून यावर होणाऱ्या चर्चेत, पूर्ण प्रयत्न असेल."
"जेव्हा निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढतो, तेव्हा यंत्रणांमध्येही अधिक संवेदनशीलता येते. जल जीवन अभियानासह आमच्या अनेक योजनांचे यश हे याचे उत्तम उदाहरण आहे."
"गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील एका पंचायतीच्या महिला सदस्यांनी विकासासंदर्भात आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यातून कळते की प्रत्यक्ष अनुभवातून व्यक्त होणारी वाणी कसे वेदवाक्य ठरते ..."
"माता-भगिनी आणि मुलींना अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही आमच्या योजनांच्या माध्यमातून निरंतर प्रयत्न केले आहेत. याची एक नव्हे तर अनेक उदाहरणे आहेत .."
* * *
सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251798)
अभ्यागत कक्ष : 9