राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बैसाखी, विशू, विषुव, बोहाग बिहू, पोईला बोईशाख, मेशादी, वैशाखादी आणि पुथांदु या सणांच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 APR 2026 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 एप्रिल 2026

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यांनी आज बैसाखी, विशू, विषुव, बोहाग बिहू, पोईला बोईशाख, मेशादी, वैशाखादी आणि पुथांदु या सणांच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे उत्सव विविध ठिकाणी 14 आणि 15 एप्रिलला साजरे केले जाणार आहेत. आपल्या शुभसंदेशात त्या म्हणतात-

“बैसाखी, विशू, विषुव, बोहाग बिहू, पोईला बोईशाख, मेशादी, वैशाखादी आणि पुथांदु  या सर्व पवित्र सणांच्या निमित्ताने मी भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या सर्व देशबांधवांना शुभेच्छा देते.

हे उत्सव, सुगीचा सण साजरा करण्यासाठी, देशभरात विविध पद्धतीने साजरे केले जातात. यावेळी आपण सर्वजण आपले पालन पोषण करणारी धरणीमाता आणि अन्नदाता शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत, कृषी परंपरा आणि एकतेची भावना, अशा उत्सवातून अभिव्यक्त आणि गहीरी होत जाते.

हे उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात, आनंद आणि समृध्दी घेऊन येवोत, अशा शुभेच्छा देत, देशाचा तसेच समाजाचा विकास करण्याची प्रेरणा आपल्याला देवोत अशी प्रार्थना मी करते.”

राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251717) अभ्यागत कक्ष : 15