लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्षांनी दिग्गज   गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

Posted On: 12 APR 2026 7:17PM by PIB Mumbai


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोकसंदेशात त्यांनी भारतीय कला आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाचा उल्लेख केला.
ज्येष्ठ गायिकेला श्रद्धांजली अर्पण करताना ओम बिर्ला म्हणाले:
“प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांसह अनेक सन्मानांनी गौरवलेल्या आशा जी यांनी दीर्घकाळ भारतीय कला क्षेत्र समृद्ध करण्यात अतुलनीय भूमिका बजावली.”
हिंदी, मराठी आणि इतर अनेक भाषांमध्ये गायन करून त्यांनी भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक वारशाची मोठी हानी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओम बिर्ला यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती तसेच जगभरातील असंख्य चाहत्यांप्रती  संवेदना व्यक्त केल्या.

***

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251370) अभ्यागत कक्ष : 12