उपराष्ट्रपती कार्यालय
प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
12 APR 2026 2:47PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
उपराष्ट्रपतींचा शोकसंदेश
प्रख्यात गायिका आशा भोसले जी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला अत्यंत दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि संगीतप्रेमींप्रती माझ्या संवेदना आहेत.
आपल्याला लाभलेल्या अष्टपैलू आवाजाच्या देणगीमुळे आशाजींना अनेक गायन प्रकार हाताळता आले, भावपूर्ण गझल आणि पारंपारिक भजनांवर प्रभुत्व मिळवता आले, त्यांनी भारतीय संगीतजगतावर आपली अमिट छाप सोडली आहे.
त्यांचा अजरामर आवाज आणि सांगीतिक वारसा कोट्यवधी लोकांच्या हृदयात रुंजी घालत राहील आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ओम शांती.
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2251276)
आगंतुक पटल : 66