पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मनाची शांतता आणि बुद्धिमान विचारांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
प्रविष्टि तिथि:
10 APR 2026 10:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कठीण प्रसंगात शांत राहणे आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.
पंतप्रधान म्हणाले की, देशातील तरुण जे साध्य करण्याचा निर्धार करतात तो पूर्ण करून दाखवतात. आपल्या युवाशक्तीच्या जोरावरच आपला देश आज विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले:
"देशातील युवा जो निर्धार करतात तो पूर्ण करून दाखवतात. आपल्या युवाशक्तीच्या जोरावरच आपला देश आज विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे.
व्यसने वाऽर्थकृच्छ्रे वा भये वा जीवनान्तके।
विमृशन् वै स्वया बुद्ध्या धृतिमान् नावसीदति॥"
संकटकाळात, आर्थिक विवंचनेत किंवा जीवावर बेतलेल्या प्रसंगात जी व्यक्ती शांत राहते आणि आपल्या बुद्धीने विचारपूर्वक निर्णय घेते, ती खचून जात नाही. कठीण परिस्थितीत घेतलेले शांत आणि विचारपूर्वक निर्णय त्या व्यक्तीला दुःख आणि हानीपासून वाचवतात.
***
NehaKulkarni / ShileshPatil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2250702)
आगंतुक पटल : 66
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Marathi
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam