राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ अजित पवार यांना दिली सदस्यत्वाची शपथ

प्रविष्टि तिथि: 09 APR 2026 2:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2026

राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्रातले नवनिर्वाचित सदस्य, पार्थ अजित पवार यांना संसद भवनात सदस्यत्वाची शपथ दिली. पार्थ पवार यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली.

राज्यसभेतील सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा सदस्य जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, लोकसभा सदस्य सुनील तटकरे, राज्यसभेचे महासचिव पी. सी मोदी  तसेच सचिवालयातील इतर वरिष्ठ अधिकारीही या प्रसंगी उपस्थित होते.


निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2250421) आगंतुक पटल : 57
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati