राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभा सभापती सी.पी.राधाकृष्णन यांनी नव्याने निवडून आलेल्या/फेर निवड झालेल्या सदस्यांना दिली शपथ

प्रविष्टि तिथि: 06 APR 2026 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2026

राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यसभा दालनात नव्याने निवडून आलेल्या/ फेर निवड झालेल्या एकोणीस  सदस्यांना शपथ दिली. शरदचंद्र पवार, रामदास बंडू आठवले, माया चिंतामण इवनाते,रामराव सखाराम वडकुते, डॉ ज्योती नागनाथ वाघमारे, ख्रिस्तोफर मणिकम, डॉ अंबुमणी रामदास, कॉन्स्टँडाईन रवींद्रन, एल के सुधीश, डॉ एम थंबीदुराई, तिरुची सिवा, बाबुल सुप्रिया बराल, डॉ मेनका गुरुस्वामी, राजीव कुमार, रुक्मिणी मल्लिक, बिस्वजित सिन्हा, संतृप्त मिश्रा, दिलीप कुमार रे आणि मनमोहन सामल या सदस्यांनी आज शपथ ग्रहण केली.

तीन सदस्यांनी मराठीत, दोन जणांनी हिंदीत, सहा जणांनी तमिळमध्ये, एकाने इंग्रजीत, चार जणांनी बंगालीत आणि तीन जणांनी ओडिया भाषेत शपथ घेतली. यापैकी पाच सदस्य महाराष्ट्र, सहा तमिळनाडू, पाच पश्चिम बंगाल आणि तीन ओडिशा या राज्यातील आहेत.

संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, आदिवासी कल्याण मंत्री जुएल ओराम, राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी आणि सचिवालयातील अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


निलीमा चितळे/राजश्री आगाशे /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2249391) आगंतुक पटल : 101
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Telugu , Kannada