रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेने अहमदाबाद आणि रतलाम विभागांसाठी 398.36 कोटी रुपये खर्चाच्या ऑप्टिकल फायबर केबल बॅकबोन प्रकल्पाला दिली मंजुरी


या प्रकल्पामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढेल आणि कवच अंमलबजावणीला मदत मिळेल

पश्चिम रेल्वेवरील दळणवळण विषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 1929 रूट किलोमीटर ऑप्टिकल फायबर जाळे टाकले जाईल ज्यामध्ये अहमदाबाद विभागातील 1456 रूट किलोमीटर आणि रतलाम विभागातील 473 रूट किलोमीटरचा समावेश आहे

Posted On: 04 APR 2026 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2026

 

भारतीय रेल्वेने पश्चिम रेल्वेवरील दळणवळण विषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एका महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामध्ये अहमदाबाद आणि रतलाम विभागांमध्ये 398.36 कोटी रुपये खर्चून 4×48 ऑप्टिकल फायबर केबल (OFC) बॅकबोन टाकण्याची  तरतूद आहे.

हा प्रकल्प “भारतीय रेल्वेच्या उर्वरित मार्गांवर लाँग टर्म इव्होल्यूशन (LTE) च्या कम्युनिकेशन बॅकबोनसह कवच प्रणालीची  तरतूद (समग्र योजना  2024–25)” या शीर्षकांतर्गत मंजूर करण्यात आला आहे, ज्यासाठी कृती कार्यक्रम 2024–25 (PH-33) अंतर्गत एकूण मंजूर खर्च 27,693 कोटी रुपये  आहे. पश्चिम रेल्वेसाठी 2,800 कोटी रुपये  खर्चासह एक विशिष्ट छोटा प्रकल्प  देखील मंजूर करण्यात आला आहे, ज्या अंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मंजूर कामाचा भाग म्हणून, पश्चिम रेल्वेवर 1929 रूट किलोमीटर (RKm) मार्गावर 2×48 फायबर ओएफसी केबल्स टाकण्यात येतील. यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:

  • अहमदाबाद विभागात 1456 रूट किलोमीटर
  • रतलाम विभागात 473 रूट किलोमीटर

दळणवळण प्रणालीच्या या महत्त्वपूर्ण विस्तारामुळे रेल्वेच्या दळणवळण प्रणालीची क्षमता, विश्वसनीयता आणि कार्यक्षमता वाढेल. यामुळे 'कवच'च्या अंमलबजावणीसह आधुनिक सिग्नलिंग प्रणालीलाही मदत  मिळेल, ज्यामुळे संपूर्ण नेटवर्कवर निर्बाध डेटा प्रसारण शक्य होईल.

हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण, सुरक्षा वृद्धी आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. यामुळे परिचालन कार्यक्षमता सुधारेल आणि प्रवासी तसेच माल वाहतुकीसाठी उत्तम सेवा प्रदान केल्या जातील.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2249055) अभ्यागत कक्ष : 18