भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी

प्रविष्टि तिथि: 03 APR 2026 1:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026

1. भारत निवडणूक आयोगाने 15 मार्च 2026 रोजी आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे, तसेच गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमधील 8 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.

2. या राज्यांमधील निवडणुका खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पडतील:

निवडणुका/पोटनिवडणुका होत असलेले राज्यं

मतदान दिनांक

आसामकेरळपुडुचेरीगोवाकर्नाटकनागालँड आणि त्रिपुरा

09.04.2026

तामिळनाडूगुजरात आणि महाराष्ट्र

23.04.2026

पश्चिम बंगाल

23.04.2026 (पहिला टप्पा)

29.04.2026 (दुसरा टप्पा)

3. 'लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951' च्या कलम 135 B नुसार, कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असलेल्या आणि 'लोकसभा', राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या 'विधानसभा' किंवा 'संसदीय/विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत' मतदान करण्यास पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी दिली जाईल.

4. अशा सुट्टीमुळे वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. या तरतुदींचे उल्लंघन करणारा कोणताही नियोक्ता दंडास पात्र ठरेल. सर्व रोजंदारी आणि कंत्राटी कामगार देखील मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी मिळण्यास पात्र आहेत.

5. आयोगाने पुढे असेही स्पष्ट केले आहे की, जे मतदार (यात कंत्राटी आणि रोजंदारी कामगारांचाही समावेश आहे) आपल्या स्वतःच्या मतदारसंघाबाहेर स्थित असलेल्या औद्योगिक किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत, परंतु ज्यांची मतदार म्हणून नोंदणी मात्र ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे, अशा मतदारसंघात झालेली आहे; त्यांनाही मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी, पगारी सुट्टीचा लाभ मिळण्याचा अधिकार असेल.

6. आयोगाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना निर्देश दिले आहेत की, या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी संबंधित सर्वांना आवश्यक ते निर्देश द्यावेत आणि सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क मुक्तपणे व सोयीस्करपणे बजावू शकतील, याची खात्री करावी.

नितीन फुल्लुके/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2248790) आगंतुक पटल : 371
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Gujarati , Tamil