गृह मंत्रालय
‘जन विश्वास विधेयक, 2026' संसदेत मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले समाधान
Posted On:
03 APR 2026 11:18AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2025
जन विश्वास विधेयकामुळे नागरिकांचे जीवन सुलभ होईल आणि व्यवसाय सुलभता वाढण्यास गती मिळेल, असे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी नमूद केले. अनेक कायदेशीर तरतुदी कमी करून, हे विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नव्या भारता’च्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणणारे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
सर्वसामान्यांचे जीवन अधिक सोपे आणि व्यवसाय अधिक सुलभ करण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले.
‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले,“संसदेत जन विश्वास विधेयक, 2026 मंजूर होणे म्हणजे भारताने जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता वाढविण्याकडे टाकलेले एक मोठे पाऊल आहे. अनेक कायदेशीर तरतुदी कमी करून, हे विधेयक सर्वांसाठी जीवन सोपे आणि व्यवसाय सुलभ करत मोदीजींच्या नव्या भारताच्या स्वप्नाला वास्तवात उतरवेल.”
नितीन फुल्लुके/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2248745)
अभ्यागत कक्ष : 38