पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाविषयी लोकसभेत केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे सामायिक केले

Posted On: 23 MAR 2026 10:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मार्च 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर लोकसभेत केलेल्या आपल्या भाषणातील काही ठळक विधाने सामायिक केली आहेत. युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सरकार भारतीयांची सोय आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून, पूर्ण संवेदनशीलतेने, दक्षतेने आणि तयारीनिशी प्रत्येक आवश्यक पाऊल उचलत असल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले आहे.

एक्स समाज माध्यमावर लिहिलेल्या अनेक पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात:

“पश्चिम अशियात सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासमोर देखील अनपेक्षित आव्हाने उभी राहिली आहेत. म्हणूनच देशाच्या संसदेने या संकटाच्या बाबतीत एकमुखाने आणि एकजुटीने जगभर आपला आवाज पोहोचवणे आवश्यक आहे.”

 

“युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आमचे सरकार भारतीयांची सोय आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आम्ही पूर्ण संवेदनशीलतेने, सतर्कतेने आणि तत्परतेने आवश्यक ती सर्व पावले उचलत आहोत.”

 

“देशातील शेतकरी बंधू-भगिनींचे अशा प्रकारच्या संकटांपासून रक्षण करण्यासाठी मागील काही वर्षांत अनेक पावले उचलली गेली आहेत. वर्तमान परिस्थितीतही त्यांच्या हिताचे रक्षण करण्यात सरकार कोणतीही कमतरता राहू देत नाही”

 

“पश्चिम आशियातील सर्व संबंधित नेत्यांशी बोलून मी तणाव कमी करण्याचे आणि हा संघर्ष संपविण्याचे आग्रही आवाहन केले आहे.  या भागात भारतीय जहाजांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने आमचे राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत.”

 

“देशातील सर्वसामान्य कुटुंबांना होणारा त्रास कमीत कमी असावा यावर आमचे मुख्य लक्ष आहे. म्हणून आम्ही घरगुती ग्राहकांना एलपीजी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे.”

 

* * *

सुषमा काणे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2244220) अभ्यागत कक्ष : 49