राष्ट्रपती कार्यालय
जागतिक क्षयरोग दिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपतींचा संदेश
Posted On:
23 MAR 2026 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2026
दरवर्षी 24 मार्च रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘जागतिक क्षयरोग दिना’च्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणतात:-
“मला हे जाणून आनंद होत आहे की, क्षयरोगामुळे (टीबी) निर्माण झालेल्या जागतिक आव्हानाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने 24 मार्च रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ पाळला जातो.”
क्षयरोग हे आजही सार्वजनिक आरोग्यापुढील एक गंभीर आव्हान आहे, ज्यामुळे जगभरातील लक्षावधी लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. तथापि, 'टीबी मुक्त भारत अभियाना'ने रोगाचे लवकर निदान करणे, मोफत उपचार सुनिश्चित करणे, पोषणविषयक सहाय्य बळकट करणे आणि रुग्णांच्या सेवेत सुधारणा घडवून आणणे या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. ही प्रगती आपला सामूहिक निर्धार आणि 'राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमा'ची ताकद अधोरेखित करते.
"मी सर्व संबंधितांना आवाहन करते की, क्षयरोग कायमचा संपुष्टात आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित निर्धाराने हातात हात घालून काम करावे."
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244081)
अभ्यागत कक्ष : 17