गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, श्री गुरू हरगोबिंद साहिब जी यांच्या 'ज्योती-ज्योत' दिवसाच्या निमित्ताने वाहिली विनम्र आदरांजली


शिखांचे सहावे गुरू श्री गुरू हरगोबिंद साहिब जी यांनी 'संत-सिपाही' परंपरा स्थापित करून, शीख धर्माला मानवतेच्या रक्षणाचे एक सशक्त माध्यम बनवले

त्यांनी 'अकाल तख्त'च्या माध्यमातून शीख धर्म बळकट केला आणि हिंदू-शीख एकतेचा संदेश दिला

Posted On: 23 MAR 2026 2:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मार्च 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, श्री गुरु हरगोबिंद साहिब जी यांच्या 'ज्योती-ज्योत' दिनानिमित्त त्यांना विनम्र आदरांजली अर्पण केली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’ वर म्हटले आहे, शिखांचे सहावे गुरू श्री गुरू हरगोबिंद साहिब जी यांनी 'संत-सिपाही' परंपरा स्थापित करून शीख धर्माला मानवतेच्या संरक्षणाचे सशक्त माध्यम केले. त्यांनी अकाल तख्त'च्या माध्यमातून शीख धर्म बळकट केला आणि हिंदूंची मुघल कारागृहातून मुक्तता करून हिंदू-शीख एकतेचा संदेश दिला. 

 

* * *

नितीन फुल्लुके/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243851) अभ्यागत कक्ष : 8