गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळासाठी सरकारचे प्रमुख म्हणून सेवा करणारे भारतातील पहिले नेते बनले आहेत - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह


पंतप्रधान मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून काम करण्याचा सिक्किमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा 8,930 दिवसांचा विक्रम मोडला

पंतप्रधान मोदी यांचे सार्वजनिक जीवनातील 8,931 दिवस, 'राष्ट्र-प्रथम' या तत्त्वावर आधारित प्रशासन, प्रामाणिक कार्य आणि प्रत्येक नागरिकाच्या अविरत सेवेप्रती असलेल्या त्यांच्या दृढ समर्पणाचे प्रतिबिंब – गृहमंत्री

24 वर्षांहून अधिक काळ एकही रजा न घेता राष्ट्र आणि येथील जनतेची सेवा करणे, ही त्यांच्या अढळ वचनबद्धतेची साक्ष – अमित शाह

जनतेचा त्यांच्यावरील विश्वास, स्नेह आणि पाठिंबा दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे गृहमंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 22 MAR 2026 3:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ‘सरकारचे प्रमुख’ म्हणून सर्वाधिक काळ सेवा करणारे भारतातील पहिले नेते बनले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सिक्किमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा 8930 दिवसांचा विक्रम मागे टाकत हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांची ही वाटचाल सेवा, कठोर परिश्रम आणि अढळ वचनबद्धतेवर आधारित आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

"सेवा, कठोर परिश्रम आणि अढळ वचनबद्धतेवर आधारित असलेला हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे,” अशी प्रतिक्रिया, 'एक्स' या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात, गृहमंत्र्यांनी दिली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्किमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा 8930 दिवसांचा विक्रम मोडीत काढत,  सरकारचे प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ सेवा करण्याचा मान मिळवला आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या 8931 दिवसांच्या सार्वजनिक जीवनकार्यात, 'राष्ट्र-प्रथम' या तत्त्वावर आधारित प्रशासन, प्रामाणिक कृती आणि प्रत्येक नागरिकाच्या अविरत सेवेप्रती असलेल्या त्यांच्या दृढ समर्पणाचे प्रतिबिंब जाणवते. या कालावधीत त्यांनी सुरुवातीला गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान म्हणून काम केले आहे. अभूतपूर्व विश्वास आणि अतुलनीय सेवेच्या पायावर उभारलेले हे दुर्मिळ सेवाव्रत आहे." 

"मोदीजींच्या अनेक दशकांच्या सेवेने स्वतःचे असे एक युग घडवले आहे. मग ते गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देणे असो,  विकासाची नवी उंची गाठणे असो, किंवा जागतिक स्तरावर राष्ट्राचा सन्मान वाढवणे असो; 'मोदी युगाने' भारताचे चित्र आमूलाग्र बदलून टाकले आहे. या 'नव्या भारता'ची जडणघडण करण्यासाठी आजीवन प्रयत्नांची आवश्यकता होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे प्रयत्न केले. 24 वर्षांहून अधिक काळ एकही दिवस सुट्टी न घेता राष्ट्र आणि राष्ट्रातील जनतेची सेवा करणे, हे त्यांच्या अढळ निष्ठेचेच मूर्तिमंत रूप आहे. याच कारणामुळे, तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तर तीन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून जनतेकडून त्यांना अभूतपूर्व प्रेम लाभले आहे. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास, प्रेम आणि पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे," असेही अमित शाह म्हणाले. 

 ***

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर /परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243585) अभ्यागत कक्ष : 16