गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दुसरे शीख गुरु, श्री अंगद देव जी यांना त्यांच्या 'ज्योती-ज्योत' दिवसानिमित्त वाहिली आदरांजली



पवित्र गुरुमुखी लिपी विकसित करून, गुरु अंगद देव जी यांनी गुरु नानक देव जी यांची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवली.

लंगर आणि संगत या परंपरा बळकट करून त्यांनी सेवा, समानता आणि बंधुत्वाचा संदेश दिला.

त्यांचे आदर्श आजही समाजाला मार्गदर्शन करत आहेत

Posted On: 22 MAR 2026 10:14AM by PIB Mumbai


 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दुसरे शीख गुरु, श्री अंगद देव जी यांच्या 'ज्योती-ज्योत' दिवसानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

एक्स वरील एका पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे की, पवित्र गुरुमुखी लिपी विकसित करून गुरु अंगद देव जी यांनी गुरु नानक देव जी यांची शिकवण सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रसारित केली. लंगर आणि संगत या परंपरा अधिक दृढ करून त्यांनी सेवा, समता आणि बंधुभावाचा प्रसार केला. त्यांचे उदात्त विचार आजही समाजाला योग्य दिशा दाखवत आहेत, असेही शाह यांनी नमूद केले.

***

नितीन फुल्लुके / शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243536) अभ्यागत कक्ष : 11