पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी दिल्या बिहार दिवसाच्या शुभेच्छा

Posted On: 22 MAR 2026 9:09AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या जनतेला बिहार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बिहारने भारतीय वारशाला प्रदीर्घ काळापासून भव्यता आणि दिव्यता प्रदान केली आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छांमध्ये नमूद केले. बिहार राज्य सध्या दररोज प्रगतीचे नवीन अध्याय लिहित आहे, यावर भर देत पंतप्रधानांनी बिहारमधील कष्टाळू आणि ऊर्जावान लोकांची समर्पित वृत्ती आणि क्षमता, 'विकसित भारत' सोबतच 'विकसित बिहार'चा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी 'एक्स'वर लिहिलेः

"बिहार दिवसानिमित्त राज्यातील माझ्या सर्व कुटुंबियांना अनेक शुभेच्छा. भारतीय वारशाला भव्यता आणि दिव्यता प्रदान करणारे आमचे हे राज्य आज प्रगतीचे नवनवीन अध्याय रचण्यात मग्न आहे. मला विश्वास आहे की, विकसित बिहारसह विकसित भारताचा संकल्प साकार करण्यात येथील कर्मठ आणि ऊर्जावान लोकांचे समर्पण आणि सामर्थ्य खूप मोलाचे ठरेल."

***

नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2243510) अभ्यागत कक्ष : 18