गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी उगादी, गुढीपाडवा, नवरेह, साजिबू चैराओबा तसेच चेटीचंद या सणांच्या निमित्ताने देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 19 MAR 2026 1:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मार्च 2026

 

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी देशातील विविध भागांत साजऱ्या होत असलेल्या पारंपरिक नववर्ष सणांच्या निमित्ताने देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

सामाजिक माध्यम एक्स वरील पोस्टच्या मालिकेत अमित शहा यांनी म्हटले आहे, “कर्नाटकातील सर्व नागरिकांना उगादीच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्षाचे स्वागत करणारा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, ऐक्य आणि समृद्धी घेऊन येवो.” 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांनी तेलुगू समाजालाही शुभेच्छा दिल्या आहे. “पराभवा नाम संवत्सराच्या या शुभ प्रसंगी सर्व तेलुगू बांधवांना उगादीच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, उत्तम आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने संदेश देताना म्हटले आहे की, “उत्साह आणि चैतन्याचा पवित्र सण असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी देशातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा! विजय, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक असलेला हा सण सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि अमर्याद आनंद घेऊन येवो, हीच माझी मनापासून इच्छा आहे.”

 

नवरेहच्या निमित्ताने शुभेच्छा देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, “पवित्र नवरेह सणाच्या निमित्ताने काश्मीरी पंडित बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. नववर्ष सर्वांच्या जीवनात शांती, आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो.”

 

मणिपूरमधील जनतेला साजिबू चैराओबा निमित्त शुभेच्छा देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, “साजिबू चैराओबा सणाच्या निमित्ताने मणिपूरमधील सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष आपल्या संस्कृतीशी नाते अधिक दृढ करो आणि सर्वांना आनंद व समृद्धीची भरभराट लाभो.”

 

चेतीचंद सणाच्या निमित्ताने सिंधी समाजाला शुभेच्छा देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, “भगवान झूलेलाल यांच्या जयंतीनिमित्त तसेच चेतीचंद सणाच्या निमित्ताने सिंधी समाजातील सर्व बंधू-भगिनींना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मानवतेला सर्वोच्च स्थान देणारे आणि परस्पर सौहार्दाचा संदेश देणारे भगवान झूलेलाल यांचे विचार मानव समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहतील. मी भगवान झूलेलाल यांच्याकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो.”

 

* * *

शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2242389) अभ्यागत कक्ष : 16