गृह मंत्रालय
माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली
एक कट्टर राष्ट्रवादी आणि स्वभावाने नम्र व्यक्ती असलेल्या पर्रीकरजींचे जीवन आणि देशाप्रती त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील
लोकांचा नेता म्हणून असलेला त्यांचा वारसा आगामी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2026 12:54PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज, माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात अमित शाह म्हणतात, “मनोहर पर्रीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली. अत्यंत कट्टर राष्ट्रवादी आणि स्वभावाने नम्र असलेल्या पर्रीकरजींचे जीवन आणि देशाप्रती त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. लोकनेता म्हणून असलेला त्यांचा वारसा आगामी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.”
***
NehaKulkarni / SanjanaChitnis / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2241090)
आगंतुक पटल : 78