अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशातील "ऑपरेशन व्हाईट हॅमर" अंतर्गत डीआरआयने बेकायदेशीर अल्प्राझोलम कारखान्यावर छापे टाकून 47 कोटी रुपयांचे 237 किलो अंमली पदार्थ आणि 3.5 टनांहून अधिक रसायने जप्त ; दोघांना अटक

Posted On: 13 MAR 2026 10:36AM by PIB Mumbai

 

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील कोंडापल्ली औद्योगिक विकास क्षेत्रात एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ अल्प्राझोलमचे उत्पादन करणाऱ्या एका छुप्या सुविधेचा पर्दाफाश केला आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवर आधारित आणि सुव्यवस्थित असे "ऑपरेशन व्हाईट हॅमर" हे अभियान 11 आणि 12 मार्च 2026 रोजी राबवण्यात आले, ज्यातून रासायनिक उत्पादन युनिटच्या नावाखाली कार्यरत असलेला अल्प्राझोलमच्या उत्पादनाचा एक पूर्ण विकसित औद्योगिक सेटअप उघडकीस आला.

परिसरात झडती घेण्यात आली असता 237 किलो अल्प्राझोलम जप्त करण्यात आले ज्याचे  बाजारमूल्य अंदाजे 47 कोटी रुपये आहे, तसेच 800 किलोहून अधिक प्रमुख कच्चा माल, 2,860 लिटर विविध रसायने आणि रिअॅक्टर, ड्रायर आणि सेंट्रीफ्यूज सारखी औद्योगिक उपकरणे जप्त करण्यात आली, ज्यातून ही एक संघटित, मोठ्या प्रमाणात गुप्त उत्पादन सुविधा असल्याचे दिसून येते.

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की रसायन आणि औषधनिर्माण क्षेत्रात 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या एका औषधविक्रेत्याने हैदराबादमध्ये कच्चा माल आणि वितरण व्यवस्था करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्याशी संगनमत केले होते. आरोपीने अल्प्राझोलमचे छुप्या पद्धतीने उत्पादन करण्यासाठी कारखान्याचा परिसर भाड्याने घेतला होता. दोन्ही सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षात, डीआरआयने गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे आठ गुप्त औषध उत्पादन युनिट्स उद्ध्वस्त केले आहेत, ज्यामुळे सरकारच्या नशा मुक्त भारत अभियान आणि समाजाचे आणि लोकांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या धोक्यापासून संरक्षण करण्याप्रति त्यांची दृढ वचनबद्धता पुन्हा स्पष्ट झाली आहे.

***

नितीन फुल्लुके / सुषमा काणे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2239618) अभ्यागत कक्ष : 11