पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देशाची प्रगती आणि हितासाठी सामूहिक शक्ती आणि निर्धाराचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले

प्रविष्टि तिथि: 11 MAR 2026 9:31AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रगती आणि हितासाठी सामूहिक शक्ती आणि निर्धाराचे महत्त्व सांगणारे पुढील संस्कृत सुभाषित सामायिक केले:

“स्वस्ति पन्थामनुचरेम सूर्याचन्द्रमसाविव।

पुनर्ददाताघ्नता जानता सङ्गमेमहि॥”

पंतप्रधान म्हणाले की भारतातील जनतेचे अमर्याद सामर्थ्य हा देशाच्या विकासाचा कणा आहे. आपल्या क्षमता आणि परस्पर विश्वास यांच्या बळावर आपण प्रत्येक निश्चय खरा करून दाखवला आहे आणि भविष्यात देखील आपण तसेच करून दाखवू.

हे सुभाषित असे सांगते की, आपण सूर्य आणि चंद्र यांच्याप्रमाणेच पवित्र मार्गावर सतत चालत राहूया. परस्पर अहिंसा, एकतानता आणि सामंजस्य तसेच एकमेकांचे पाठबळ यांच्या साथीने आपण प्रगती आणि हिताच्या दिशेने एकत्र पुढे जाऊया.

एक्स समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“भारतवासीयांची अमर्याद शक्तीच देशाच्या विकासाचा कणा आहे. आपले सामर्थ्य आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर आपण प्रत्येक निर्धार खरा करून दाखवत आलो आहोत आणि यापुढे देखील तसेच करत राहू.

स्वस्ति पन्थामनुचरेम सूर्याचन्द्रमसाविव।

पुनर्ददाताघ्नता जानता सङ्गमेमहि॥”

***

NehaKulkarni / SanjanaChitnis / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2238020) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam