पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या संदेशात दृढनिश्चय, संयम आणि आत्मविश्वासाच्या मूल्यांची महती सांगणारे संस्कृत सुभाषित

प्रविष्टि तिथि: 09 MAR 2026 9:33AM by PIB Mumbai

टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकून भारतीय संघाने सिद्ध केले की दृढ निश्चय, संयम आणि आत्मविश्वास यांचा संगम हा जीवनातील यशाचा मूलमंत्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. योग्य दिशेने कठोर परिश्रम केल्यास प्रत्येक ध्येय साध्य करता येते हे हा विजय दर्शवितो, असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित समाज माध्यमावर दिले,

“अभीप्सां स्वात्मनो रक्षाऽविरतं सुस्थिरं तया। 

यत्नमातिष्ठ धैर्येण ततः सिद्धिर्भवेद् ध्रुवम्।।”

जीवनात प्रगती साधायची असेल तर सातत्य आणि दृढ निश्चयाने प्रयत्न केले पाहिजेत, सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि संयम यांच्या संगमामुळे नक्कीच यशाचा मार्ग खुला होतो, असा या सुभाषिताचा आशय आहे.

पंतप्रधानांनी एक्सवरील संदेशात म्हटले आहे, 

“टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकून भारतीय संघाने सिद्ध केले की दृढ निश्चय, संयम आणि आत्मविश्वास यांचा संगम हा जीवनात यश मिळवण्याचा मूलमंत्र आहे. हा विजय हेही दर्शवितो की योग्य दिशेने कठोर परिश्रम केल्यास प्रत्येक ध्येय गाठता येते.

अभीप्सां स्वात्मनो रक्षाऽविरतं सुस्थिरं तया। 

यत्नमातिष्ठ धैर्येण ततः सिद्धिर्भवेद् ध्रुवम् ।।”

***

NehaKulkarni / RshmaBedekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2236830) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam