गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी जन औषधी दिवस 2026 निमित्त प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेच्या (पीएम-बीजेपी) सर्व लाभार्थ्यांना दिल्या हार्दिक शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 07 MAR 2026 1:07PM by PIB Mumbai



केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी जन औषधी दिवस 2026 निमित्त प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेच्या (PMBJP) सर्व लाभार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या समाज माध्यमावरील संदेशात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारच्या या उपक्रमामुळे देशातील गरिबांवरचा औषधांचा आर्थिक भार कमी झाला असून जेनेरिक औषधांबद्दल जागरूकता वाढली आहे. आज देशभरातील सुमारे 18,000 जन औषधी केंद्रे गरीब आणि गरजूंना परवडणारी आणि सुलभ औषधे उपलब्ध करून देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या योजनेमुळे देशातील नागरिकांची 40,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक बचत झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2236324) आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil