महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी कर्तव्य पथावर आयोजित केला जाणार - 'शक्ती वॉक - #SheLeadsBharat'


विविध क्षेत्रातील महिला सहभागी #SheLeadsBharat या संकल्पनेअंतर्गत येणार एकत्र, प्रगतीशील आणि समावेशक भारत घडवण्यातील महिलांची मध्यवर्ती भूमिका होणार अधोरेखित

Posted On: 07 MAR 2026 9:41AM by PIB Mumbai

 

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालय आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून उद्या (8 मार्च 2026) नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर "शक्ती वॉक #SheLeadsBharat" नावाच्या महिलांच्या नेतृत्वाखालील पदयात्रेचे आयोजन करत आहे.

8 मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन जीवनाच्या सर्व क्षेत्रातील महिलांची कामगिरी, नेतृत्व आणि योगदानाचा उत्सव साजरा करतो आणि लैंगिक समानता, सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरणाप्रती सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी करतो. याच भावनेतून प्रगतीशील आणि समावेशक भारत घडवण्यातील महिलांच्या मध्यवर्ती भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी शक्ती वॉक आयोजित केला जात आहे.

महिलांचे नेतृत्व आणि विविध क्षेत्रातील योगदान साजरे करणे, महिलांच्या सुरक्षा, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी सरकारची वचनबद्धता बळकट करणे, महिलांना लाभदायक असलेल्या प्रमुख योजना आणि उपक्रमांचे प्रदर्शन करणे, विविध पार्श्वभूमी असलेल्या महिलांमध्ये एकता आणि सामूहिक अभिमान वाढवणे तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा राष्ट्रीय प्रगतीचा केंद्रबिंदू आहे हा संदेश देणे हे शक्ती पदयात्रेचे उद्दिष्ट आहे.

ही पदयात्रा सकाळी 7:30 ते 10:00 वाजेपर्यंत चालेल, ज्यामध्ये इंडिया गेट ते विजय चौक असा कर्तव्य पथावरील सुमारे 2 किलोमीटरचा मार्ग व्यापला जाईल.

या कार्यक्रमात 150 हून अधिक मंत्रालये, विभाग आणि संघटनांमधील सुमारे 3000 महिला सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यात सशस्त्र दले, पोलिस, माध्यमे, आरोग्यसेवा, क्रीडा, सरकारी संस्था, उद्योग आणि तळागाळातील संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. सहभागी #SheLeadsBharat या संकल्पनेखाली एकत्र चालतील, ज्यामध्ये प्रगतीशील आणि समावेशक भारत घडवण्यातील महिलांची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित होईल.

भारत सरकारच्या विविध मंत्रालयांतील आणि विभागांमधील महिला अधिकाऱ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधी देखील सहभागी होतील.

या पदयात्रेचे नेतृत्व महिला लोकप्रतिनिधी करतील, ज्यात केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार आणि इतर प्रतिष्ठित महिला नेत्या आणि विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचा समावेश असेल.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या संक्षिप्त भाषणांनी होईल आणि त्यानंतर पदयात्रेला औपचारिक झेंडा दाखवला जाईल.

महिलांसाठीच्या प्रमुख सरकारी योजना तसेच विविध क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीचे प्रदर्शन करणारी प्रतिष्ठापने कर्तव्यपथावर प्रदर्शित केली जातील.

इंडिया गेट येथे आयोजित एका सांस्कृतिक सादरीकरणात स्त्रीत्वाची भावना आणि राष्ट्रीय अभिमानाचे दर्शन घडवले जाईल. समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि भारतातील महिलांचे सामर्थ्य यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डोल्लू कुनिता, कलारीपयट्टू, मशृंगारीमेलम,  रणचंडी आणि घूमर या सादरीकरणांचा समावेश यात असेल.

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2236305) अभ्यागत कक्ष : 30