वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षणामध्ये सेवा म्हणून भारताच्या निर्यात उत्पन्नात वाढ करण्याची आणि उच्च दर्जाचे भारतीय शिक्षण जगापर्यंत पोहोचवण्याची मोठी क्षमता आहे- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल


सेवा म्हणून शिक्षणामध्ये भारताच्या निर्यात उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान देण्याची आणि उच्च दर्जाचे भारतीय शिक्षण जगभर पोहोचवण्याची मोठी क्षमता आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल म्हणाले

Posted On: 06 MAR 2026 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मार्च 2026

आज नवी दिल्ली येथे "विकसित भारत 2047 साठी उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणची पुनर्कल्पना " या विषयावरील कुलगुरूंच्या परिषदेला गोयल यांनी संबोधित केले. गोयल म्हणाले की, कुलगुरूंशी संवाद साधायला आणि भारतातील उच्च शिक्षणाच्या भविष्याबद्दल त्यांच्या कल्पना आणि विचार ऐकायला आपल्याला आवडेल.

या परिषदेने आंतरराष्ट्रीय भागीदारी, विद्यार्थ्यांची गतिशीलता, नियामक चौकटी आणि दुहेरी पदवी कार्यक्रमांसह उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रमुख पैलूंवर विस्तृत चर्चा करण्यासाठी आणि तज्ञांबरोबर संवादासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सहभागींनी भारतीय उच्च शिक्षण संस्थांची जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्याच्या धोरणांवर देखील सविस्तर चर्चा केली, तसेच शिक्षण गतिशीलतेतील उदयोन्मुख जागतिक कल तपासण्याच्या आणि विस्तारत असलेल्या जागतिक शिक्षण सेवा बाजारपेठेत भारताची उपस्थिती मजबूत करण्याच्या संधींचा शोध घेतला.

ते म्हणाले की, भारतासारखे विकसनशील किंवा कमी विकसित देश जगाचे भविष्यातील विकासाचे  इंजिन असण्याची शक्यता आहे. म्हणूनच, भारताशी परिचय  विकसित देशांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरमध्ये मदत करेल .

गोयल म्हणाले की, मुक्त व्यापार करार (एफटीए ) मधील सेवा प्रकरणांवर चर्चा  करताना त्यांना या प्रवृत्तीची वाढती पसंती  दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अंतिम रूप दिलेले नऊ एफटीए  हे सर्व विकसित अर्थव्यवस्थांसोबत झाले आहेत असे त्यांनी नमूद केले. भारताने अधिक विकसित आणि प्रगत  अर्थव्यवस्थांसोबत संबंध प्रस्थापित केल्यामुळे जागतिक व्यापाराचा जवळपास दोन तृतीयांश भाग आता भारताच्या एफटीए अंतर्गत आला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की यातून  भारताच्या जागतिक संबंधाप्रति दृष्टिकोनातील बदल प्रतिबिंबित होतो. ते म्हणाले की देश आता कमकुवत स्थिती किंवा वसाहतवादी मानसिकतेतून वाटाघाटी करत नाही. उलट ,भारत आता आत्मविश्वासाने आणि भक्कमपणे  जगाशी संवाद साधतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शिक्षण धोरण  2020 चा मसुदा तयार करताना देशभरातील शिक्षणतज्ञांबरोबर व्यापक सल्लामसलत करून भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा सर्वसमावेशक  प्रयत्न करण्यात आला असे ते म्हणाले.

परिषदेत उपस्थित असलेल्या कुलगुरूंना संबोधित करताना ते म्हणाले की, प्रत्येक कुलगुरूवर उद्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि आधुनिक विकसित राष्ट्राचा पाया रचण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याची मोठी  जबाबदारी असते.

ते म्हणाले की शैक्षणिक संस्थांना त्यानुसार त्यांच्या अभ्यासक्रमांचे आणि अध्यापन शैलींचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल.

उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि 2047 पर्यंत भारताला जागतिक शिक्षण केंद्रात रूपांतरित करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण जगत , सरकार आणि उद्योग यांच्यात अधिक सहकार्याला प्रोत्साहन देऊन मंत्र्यांनी भाषणाचा  समारोप केला.


निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2236068) अभ्यागत कक्ष : 20