राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रेस निवेदन

Posted On: 05 MAR 2026 11:36PM by PIB Mumbai

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारला 

यासोबतच, राष्ट्रपतींनी खालीलप्रमाणे राज्यपाल/नायब राज्यपाल यांची नियुक्ती केली आहे, :-

(i) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(ii) तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(iii) नंद किशोर यादव यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(iv) लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(v) तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे..

(vi) केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे..

(vii) लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे..

(viii) दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांची लडाखच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(ix)  तरणजीत सिंग संधू यांची दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्त्या त्यांच्या संबंधित पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील

***

NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2235871) अभ्यागत कक्ष : 72