पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृढ संकल्प आणि अथक परिश्रम यांचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

Posted On: 06 MAR 2026 9:36AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारतातील लोक त्यांच्या दृढ संकल्पाने कठिणातील कठीण कार्य शक्य करुन दाखवतात. योग्य दिशेने केलेल्या अथक परिश्रमांच्या जोरावर ते उत्तुंग उद्दिष्ट देखील साध्य करु शकतात.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे-
“यद् दूरं यद् दुराराध्यं यच्च दूरे व्यवस्थितम्। तत् सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम्॥”
या सुभाषितातून असे म्हणायचे आहे की आपले उद्दिष्ट किती दूर असले, किती अवघड वाटत असले तरी दृढ संकल्प आणि अथक परिश्रमांनी ते साध्य करता येऊ शकते.  दृढनिश्चय आणि संयम ही अशक्य गोष्टीला शक्य बनवणारी शक्ती आहे.
पंतप्रधानांनी 'एक्स'वर लिहिले आहे :

"भारतीय लोक त्यांच्या दृढनिश्चयाच्या जोरावर कोणतेही कार्य शक्य करतात. योग्य दिशेने अथक परिश्रम करून, ते सर्वात मोठी उद्दिष्टे देखील साध्य करतात."
यद् दूरं यद् दुराराध्यं यच्च दूरे व्यवस्थितम्।
तत् सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम्॥”

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav


(Release ID: 2235834) अभ्यागत कक्ष : 18