युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
अमृत पिढी केंद्रीय अर्थसंकल्पात सहभागी: माय भारत बजेट क्वेस्ट 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 47,000 निबंध दाखल होण्याचा विक्रम
Posted On:
05 MAR 2026 7:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत द्वारे आयोजित केलेल्या माय भारत बजेट क्वेस्ट 2026 ला देशभरातील युवावर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 47,000 निबंध दाखल झाल्याची नोंद झाली आहे, ज्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात सहभागी होण्याचा आणि विकसित भारत@2047 च्या दृष्टिकोनासाठी कल्पनांचे योगदान देण्याचा भारतातील युवा नागरिकांमधील वाढता उत्साह दिसून येतो.
या संदर्भात माय भारत मंचावर (mybharat.gov.in) आयोजित केलेला माय भारत बजेट क्वेस्ट 2026 हा एक अनोखा उपक्रम म्हणून उदयास आला आहे जो केंद्रीय अर्थसंकल्प देशातील युवावर्गाच्या जवळ आणतो, त्यांना त्याचे प्राधान्यक्रम समजून घेण्यास, त्याच्या दृष्टिकोनावर चिंतन करण्यास आणि भारताच्या विकास प्रवासासाठी सक्रियपणे कल्पनांचे योगदान देण्यास सक्षम करतो.
देशव्यापी ऑनलाइन प्रश्नमंजुषेद्वारे युवा जागरूकता आणि केंद्रीय अर्थसंकल्पाची समज वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या उद्देशावर आधारित, माय भारत बजेट क्वेस्ट 2026 मध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 12,00,000 हून अधिक युवा सहभागी झाले. त्यापैकी उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सर्वाधिक सहभागासह अव्वल तीन कामगिरी करणारी राज्ये म्हणून उदयास आली आहेत.
प्रश्नमंजुषेनंतर प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सहभागींना निबंध फेरीसाठी निवडण्यात आले, जिथे त्यांनी भारताच्या विकास प्रवासाशी संबंधित विषयांवर आपले विचार आणि धोरणात्मक दृष्टिकोन सादर केले.
याच्या आणखी एक पाऊल पुढे टाकत, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पातळीवरील विजेत्यांना 15 मार्च 2026 पासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल, जिथे ते केंद्रीय अर्थसंकल्प आणि विकसित भारताच्या प्रवासातील त्याचे परिणाम यावर चर्चा करतील.
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235714)
अभ्यागत कक्ष : 85