पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक वन्यजीव दिन 2026 निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव संरक्षणाप्रती वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार


नैसर्गिक वारसा जपण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत- केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे आवाहन

Posted On: 03 MAR 2026 3:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2026

समाज माध्यमावरील संदेशांच्या मालिकेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत, आपल्या वसुंधरेला समृद्ध करणाऱ्या आणि आपल्या परिसंस्था टिकवून ठेवणाऱ्या समृद्ध प्राणी विविधतेचे संरक्षण करण्याचे महत्त्व त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. आपले धर्मग्रंथ सर्व सजीवांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात तसेच वन्यजीवांच्या संवर्धनाबरोबरच त्यांच्याबद्दल संवेदनशीलता निर्माण करतात, असे पंतप्रधानांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरेवर भर देताना सांगितले. (सविस्तर प्रसिद्धी पत्रक:https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2234819&reg=3&lang=1)

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला. पृथ्वीच्या अद्भुत जैवविविधतेचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. वन्यजीवांचे जतन करणे केवळ पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाचे नाही तर वसुंधरेच्या नैसर्गिक वारशाचे रक्षण करण्यासाठी समाजात सतत प्रयत्न करणे आवश्यक असलेली एक सामायिक जबाबदारी देखील आहे, असे ते म्हणाले.

X या समाज माध्यमावरील एका संदेशात यादव यांनी अधोरेखित केले की भारत आपल्या समृद्ध परिसंस्थेला धोका निर्माण करणाऱ्या अनेक संकटांबाबत जागरूक आहे. "म्हणूनच आपण केवळ आपल्याकडे असलेल्या गोष्टींचे संवर्धन करण्यासाठीच नव्हे तर परिसंस्थेच्या पुनर्संचयनासाठी प्रमुख प्रजाती संरक्षणासाठी देखील वचनबद्ध आहोत", असे ते म्हणाले.

वन्य प्राणी आणि वनस्पतींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. दरवर्षी, आपण मानवांसाठी आणि वसुंधरेसाठी वन्यजीवांच्या अद्वितीय भूमिका आणि योगदान जाणतो. मानव आणि वसुंधरेच्या कल्याणासाठी वन्यजीवांची महत्वाची  भूमिका ओळखून जैवविविधतेचे संरक्षण करण्याची आपली सामूहिक जबाबदारी हा दिवस  अधोरेखित करतो.

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2235009) अभ्यागत कक्ष : 61