ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्र सरकारने पुद्दुचेरीमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएम जीकेएवाय) अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणासाठी सीबीडीसी-आधारित डिजिटल फूड करन्सी पथदर्शक प्रकल्पाचा केला प्रारंभ
सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सीबीडीसी’चा समावेश म्हणजे पारदर्शक आणि सक्षम अन्न वितरण व्यवस्थेच्या दिशेने एक मोठे पाऊल: केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
‘प्रत्येक अन्नकण, प्रत्येक रुपया, प्रत्येक हक्क’ – सीबीडीसी-आधारित डिजिटल फूड कूपन हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एक मैलाचा दगड : प्रल्हाद जोशी
Posted On:
26 FEB 2026 11:01PM by PIB Mumbai
चेन्नई, 26 फेब्रुवारी 2026
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएम जीकेएवाय) अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणासाठी (डीबीटी) केंद्रीय बँक डिजिटल चलन (सीबीडीसी)-आधारित डिजिटल फूड करन्सी पथदर्शक प्रकल्पाचा पुद्दुचेरी इथे प्रारंभ केला. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी 2026 रोजी पुद्दुचेरी येथे या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन; पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी उपस्थित होते.
1OME.jpeg)
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सीबीडीसी’चा समावेश भारताच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेत एक परिवर्तनकारी टप्पा आहे, असे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये केंद्रीय बँक डिजिटल चलनाचा (सीबीडीसी) समावेश केल्याने पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लाभार्थी सक्षमीकरण वाढेल, ज्यामुळे 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना त्यांचे हक्क अधिक स्पष्टता आणि जबाबदारीसह मिळतील, हे जोशी यांनी अधोरेखित केले. "प्रत्येक अन्नकण, प्रत्येक रुपया, प्रत्येक हक्क" या दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की या सुधारणांमुळे लाभार्थ्यांमध्ये त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढेल, सुरक्षित आणि रिअल-टाइम व्यवहार शक्य होतील तसेच कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीत ‘डिजिटल इंडिया’ उपक्रम आणखी बळकट होईल.

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सीबीडीसीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग सचिवांनी माहिती दिली की सीबीडीसी-आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली मॉडेलचा विस्तार पुद्दुचेरीमध्ये करण्यात येणार असून त्यानंतर चंदीगड तसेच दादरा आणि नगर हवेलीमध्येही ते राबवण्यात येईल. पुढे टप्प्याटप्प्याने देशभर त्याचा विस्तार करण्याची योजना आहे.
FNWC.jpeg)
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234804)
अभ्यागत कक्ष : 15