पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील एका कारखान्यातील स्फोटात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून पंतप्रधानांनी केली मदत जाहीर

Posted On: 28 FEB 2026 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2026

 

आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे.

या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्या कुटुंबियांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करताना, जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली.

प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) 2 लाख रूपये तर स्फोटात जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपये मदत स्वरूपात दिले जातील.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले;

"आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात झालेल्या जीवितहानीमुळे मी दुःखी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. जखमींना जखमींना लवकर बरे वाटावे, अशी कामना करतो.” 

प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”

"ఆంధ్రప్రదేశ్‌, కాకినాడ జిల్లాలోని కర్మాగారంలో ప్రమాదవశాత్తు జరిగిన పేలుడులో ప్రాణనష్టం సంభవించడం చాలా బాధాకరం. ఈ క్లిష్ట సమయంలో బాధిత ప్రజలు మరియు వారి కుటుంబాలకు నా ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తూ, గాయపడినవారు త్వరగా కోలుకోవాలని ప్రార్థిస్తున్నాను.

ప్రమాదంలో మరణించిన వారి కుటుంబాలకు రూ. 2 లక్షలు, గాయపడిన వారికి రూ. 50,000 ఎక్స్ గ్రేషియా పిఎంఎన్ఆర్ఎఫ్ నుండి ఇవ్వబడుతుంది"

 

 

* * *

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2234016) अभ्यागत कक्ष : 12