पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधानांचा इस्रायल दौरा

Posted On: 26 FEB 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026

 

अ.क्र.

सामंजस्य करार / कराराचे नाव

संक्षिप्त विवरण

1.

भू-भौतिकीय उत्खनन क्षेत्रातील सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

या सामंजस्य कराराअंतर्गत, प्रगत भू-भौतिकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून खनिज उत्खनन क्षेत्रात भारत आणि इस्रायल मधील सहकार्याचा विस्तार केला जाईल, माहितीसाठ्याची देवाणघेवाण केली जाईल, गुंतवणूक आणि संसाधनांच्या शाश्वत संसाधने विकसित केली जातील.

2.

गुजरातमधील लोथल इथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या (NMHC) विकासासाठीचा सामंजस्य करार

या सामंजस्य कराराअंतर्गत प्रदर्शने, संशोधन, प्रकाशने आणि तज्ज्ञांची देवाणघेवाण या माध्यमातून परस्पर सामायिक सागरी वारशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने भारत आणि इस्रायलमधील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. यासोबतच राष्ट्रीय सागरी वारसा संकुल आणि व्यापक लोकसहभागाला पाठबळ मिळेल.

3.

 

2026-2029 या कालावधी दरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम (CEP)

सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाअंतर्गत (CEP) संगीत, रंगभूमी, दृश्य कला, नृत्य आणि इतर सर्जनशील क्षेत्रांअंतर्गतचे महोत्सव, कार्यशाळा आणि तज्ज्ञांच्या भेटींच्या माध्यमातून भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतिक संबंध आणि परस्पर सामंजस्य अधिक दृढ केले जाणार आहे.

4.

युपीआयच्या (UPI) अंमलबजावणीसाठी एनपीसीआय इंटरनॅशनल (NIPL) आणि इस्रायलची मासाव (MASAV) या संस्थांदरम्यान सामंजस्य करार

एकात्मिक देयक प्रणाली अर्थात UPI च्या माध्यमातून भारत आणि इस्रायल दरम्यान परस्पर देशांदरम्यान होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये (Remittances) सुलभता आणणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

5.

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि माशाव (MASHAV) या संस्थांमध्ये कृषी क्षेत्रासाठी भारत-इस्रायल नवोन्मेष केंद्र (IINCA) स्थापनेबाबतचा सामंजस्य करार

या सामंजस्य कराराअंतर्गत विशिष्ट शेती अर्थात प्रिसिजन फार्मींग, उपग्रह-आधारित सिंचन, प्रगत यंत्रसामग्री आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत नेक्स्ट जनरेशन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संयुक्त नवोन्मेष केंद्र स्थापन करण्याची तरतूद आहे, यासोबतच तसेच बियाणे / वंशद्रव्यांची (Germplasm) देवाणघेवाण आणि कापणी पश्चात व्यवस्थापनालाही पाठबळ पुरवले जाणार आहे.

6.

होरायझन स्कॅनिंग (भविष्यातील कल आणि संधींचा माग घेणे) क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या इरादा जाहीरनाम्याची घोषणा

या इरादा जाहीरनाम्याद्वारे संयुक्त संशोधन, क्षमता बांधणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांच्या माध्यमातून धोरणात्मक दूरदृष्टी, जोखीम मूल्यांकन आणि तंत्रज्ञानाचे नियोजन या क्षेत्रांअंतर्गत प्रगत स्वरुपात होरायझन स्कॅनिंग (भविष्यातील कल आणि संधींचा माग घेणे) करण्यासाठी भारत आणि इस्रायल मधील परस्पर सहकार्याला अधिक बळकटी दिली जाणार आहे.

7.

मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील सहकार्यासाठीचा सामंजस्य करार

या सामंजस्य कराराअंतर्गत प्रगत व्यवस्था, रोग व्यवस्थापन, सागरी मत्स्यपालन आणि समुद्री शेवाळ अशा व्याप्तीच्या तंत्रज्ञान - आधारित आणि शाश्वत मत्स्यव्यवसाय क्षेत्रात संशोधन आणि विकास, व्यापार, प्रशिक्षण तसेच उत्कृष्टता केंद्राच्या (Centre of Excellence) माध्यमातून भारत आणि इस्त्रायल मधील सहकार्याचा विस्तार केला जाणार आहे.

8.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) आणि इस्रायल रोखे प्राधिकरण (ISA) यांच्यादरम्यान सामंजस्य करार

दोन्ही प्राधिकरणे माहितीची देवाणघेवाण, सर्वोत्तम कार्यपद्धती, वित्तीय तंत्रज्ञान (Fintech) तसेच नियामक तंत्रज्ञानातील (Regtech) सहकार्य अशा माध्यमातून आर्थिक सेवा क्षेत्रातील नवोन्मेषाधारित परिसंस्थेला चालना देणार आहेत.

9.

वाणिज्य आणि सेवा क्षेत्रातील कामगारांच्या परस्पर देशांमधील ये- जा करण्यासंबंधीच्या मानक नियमावलीची (प्रोटोकॉल) अंमलबजावणी

या मानक नियमावलीच्या (प्रोटोकॉल) अंमलबजावणीच्या माध्यमातून किरकोळ विक्री, स्वच्छता विषयक क्षेत्र, व्यावसायिक वाहतूक (logistics), गोदाम विषयक क्षेत्र, अन्न प्रक्रिया, आदरातिथ्य आणि पुनर्प्रक्रिया या आणि अशा क्षेत्रांमध्ये भारतीय कामगारांना नियमनाअंतर्गत असलेल्या प्रणालींअंतर्गत इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

10.

उत्पादन क्षेत्रातील कामगारांच्या देवाणघेवाणीसंबंधीच्या अंमलबजावणीचे नियम

यामध्ये वस्त्रोद्योग, धातू, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, अन्न प्रक्रिया, लाकूड आणि कागद, प्लास्टिक, रबर आणि इतर औद्योगिक क्षेत्रांसह विविध निर्मिती उद्योगांमध्ये भरतीचा समावेश आहे.

11.

रेस्टॉरंट क्षेत्रातील कामगार देवाघेवाणीसंबंधीच्या अंमलबजावणीचे नियम

यामध्ये रेस्टॉरंट्स, कॅफे आणि इतर अन्नपदार्थ तयार करणे आणि विक्री व्यवसायांमधील भरतीचा समावेश आहे.

12.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराद्वारे शिक्षण क्षेत्रात प्रगतीसाठी एआय-आधारित, मानव-केंद्रित शिक्षण हा केंद्रबिंदू ठेवून नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र, शिक्षक विकास, नियामक चौकटी, समन्यायी एआय प्रवेश या सर्व घटकांसह सहकार्यासाठी सामंजस्य करार

यामध्ये संशोधनाची देवाणघेवाण आणि समावेशक, भविष्यासाठी सिद्ध शिक्षणाकरिता एआय आणि डेटा साक्षरता यांची जोड देण्याचाही समावेश आहे.

13.

इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ कमर्शियल आर्बिट्रेशन (आयआयसीए) आणि इंडियन कौन्सिल ऑफ आर्बिट्रेशन (आयसीए) यांच्यातील सहकार्याचा करार

हा करार दोन्ही देशांमधील अनुभव बळकट करण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण, सर्वोत्तम पद्धती आणि संयुक्त प्रशिक्षणाद्वारे मध्यस्थी आणि मध्यस्थीमध्ये सहकार्याला चालना देणारा आहे.

14.

चौथ्या भारत-इस्रायल सीईओ फोरमच्या अहवालाचे सादरीकरण

नोव्हेंबर 2025 मध्ये इस्रायलमध्ये चौथ्या सीईओ फोरमचे आयोजन करण्यात आले तसेच दोन्ही बाजूंच्या सरकारांना संयुक्त अहवाल सादर करण्यात आला. हा अहवाल उद्योगातील ट्रेंडशी सुसंगत धोरणे आखण्यास, सार्वजनिक-खाजगी सहकार्याला प्रोत्साहन देण्यास आणि माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास सहाय्यक अंतर्दृष्टी देण्यासोबत शिफारशी सुचवणारा आहे.

15.

नालंदा विद्यापीठ आणि जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठ (एचयूजेआय) दरम्यानचा सामंजस्य करार

हा सामंजस्य करार बौद्ध धर्मविषयक अभ्यास, पुरातत्वशास्त्र, गणित आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसह विविध विषयांमध्ये दोन्ही विद्यापीठांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थी देवाणघेवाणीसाठी चौकट स्थापित करतो.

16.

भारतात इंडो-इस्रायल सायबर सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापनेबाबतचे इरादा पत्र

या इरादा पत्रात सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्याला प्रोत्साहन, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि डिजिटल लवचिकता या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करण्याच्या अनुषंगाने भारतात संयुक्त सायबर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेचा उद्देश व्यक्त केला आहे.

17.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मध्ये सहकार्याबाबत सामंजस्य करार

हा सामंजस्य करार एआय विकास आणि क्षमता उभारणीमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणारा असून तो एआयचा नैतिक वापर, नागरी क्षेत्रात त्याचे उपयोजन, शैक्षणिक संशोधन आणि शाश्वत विकासासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीला पाठिंबा देणारा आहे.

 

घोषणा

1. संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावणे

2. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित जेसीएमला मंत्रीस्तरीय वाढीव दर्जा

3. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या नेतृत्वाखालील महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानात सहकार्यासाठीचा उपक्रम

4. वित्तीय संवाद

5. टेक-गेटवे उपक्रम

6. कृषी संशोधनात 20 संयुक्त पाठ्यवृत्ती

7. संयुक्त संशोधनाची गरज असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूंचे वाढीव योगदान

8. पुढील पाच वर्षांत भारतीय कामगारांसाठी 50,000 पर्यंतचा कोटा.

9. भारत-इस्रायल शैक्षणिक सहकार्य मंच

10. भारत-इस्रायल संसदीय मैत्री गट

सुषमा काणे/तुषार पवार/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2233316) अभ्यागत कक्ष : 12